उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीला ब्रेक; लक्ष्य १०० कोटी, वसुली ४० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 11:59 PM2021-01-29T23:59:20+5:302021-01-29T23:59:30+5:30

नागरिक अभय योजनेच्या प्रतीक्षेत, शहरात एक लाख ७९ हजार मालमत्ताधारक असून, विभागाची ५०० कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे

Break in Ulhasnagar Municipal Corporation's property tax collection; Target 100 crores, recovery 40 percent | उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीला ब्रेक; लक्ष्य १०० कोटी, वसुली ४० टक्के

उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीला ब्रेक; लक्ष्य १०० कोटी, वसुली ४० टक्के

googlenewsNext

उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कराबाबत अभय योजना सुरू होईल या प्रतीक्षेत नागरिक असल्याने ते कर भरत नसल्याने वसुलीला ब्रेक लागला आहे. गेल्या १० महिन्यांत ४० कोटींपेक्षा कमी करवसुली झाली आहे. यामुळे अभय योजना सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली.

मालमत्ता कर विभाग नेहमीच वादात राहिला आहे. विभागाचा पदभार हा लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे दिला आहे. गेल्या वर्षी जानेवारीत ७० कोटींपेक्षा जास्त कर वसुली झाली होती, तर चालू वर्षी ४० कोटींपेक्षा कमी वसुली झाली आहे. पालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत मालमत्ता कर हा आहे. मात्र, कोरोनाकाळात नागरिकांनी हा कर भरला नाही. काही नगरसेवकांनी मालमत्ता करात ३० टक्के सवलत देण्याची मागणी केली होती, तर आता विरोधी पक्षनेते किशोर वनवारी व भाजपच्या नगरसेवकांनी मालमत्ता कर विभागात अभय योजना लागू करा, अशा मागणीचे पत्र आयुक्तांना दिले आहे.

शहरात एक लाख ७९ हजार मालमत्ताधारक असून, विभागाची ५०० कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे. यामध्ये नऊ हजार मालमत्तांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले. या मालमत्तेची दुबार नोंदणी, हयात नसणे, मालमत्ता मिळून न येणे असे प्रकार वर्षानुवर्षे होत आहेत. अशा वादग्रस्त मालमत्ता रद्द करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत आला होता. मात्र, सर्वसंमतीने प्रस्ताव फेटाळून या मालमत्तेचे पुन:सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. अशा बेनामी मालमत्तेमुळे विभागाची थकबाकी फुगलेली दिसत असल्याची प्रतिक्रिया उपमहापौरांनी दिली.

मालमत्तेची सर्वेक्षण प्रक्रिया रखडली
शहरातील मालमत्तेचे पुन:सर्वेक्षण करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले आहे. एका वर्षात मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यावर दुप्पट मालमत्ता कर जमा होईल असे बोलले जात होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सर्वेक्षणाचे काम ठप्प पडले असून, ६ कोटींपैकी दोन कोटी सहा लाख रुपयांचा निधी कंपनीला सर्वेक्षणापोटी दिल्याची माहिती विभाग प्रमुखांनी दिली.

Web Title: Break in Ulhasnagar Municipal Corporation's property tax collection; Target 100 crores, recovery 40 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.