बीएमसीच्या एफडी मोडणे म्हणजे चिंताजनक गोष्ट - खासदार सुप्रिया सुळे

By अजित मांडके | Published: January 21, 2023 03:35 PM2023-01-21T15:35:56+5:302023-01-21T15:36:28+5:30

केंद्र सरकार सातत्याने म्हणते त्यांच्याकडे खूप पैसे आहे, त्याची कमतरता येणार नाही, मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली.

Breaking of BMC's FD is a matter of concern - MP Supriya Sule | बीएमसीच्या एफडी मोडणे म्हणजे चिंताजनक गोष्ट - खासदार सुप्रिया सुळे

बीएमसीच्या एफडी मोडणे म्हणजे चिंताजनक गोष्ट - खासदार सुप्रिया सुळे

googlenewsNext

ठाणे : केंद्र सरकार सातत्याने म्हणते त्यांच्याकडे खूप पैसे आहे, त्याची कमतरता येणार नाही, मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली. मला वाटते ही एक चिंताजनकच गोष्ट आहे. असे विधान करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

पुढे बोलताना, त्यांनी एफडी कधी मोडतो जेव्हा अडचण येते तेव्हा यामध्ये शिक्षण असो लग्नकार्य, मेडिकल अथवा खर्च वाढतो तेव्हा मोडतो. मात्र अडचणीच्या काळात एफडी वापरला जातात मग अशी काय अडचण आली आहे असा सवाल त्यांनी ठाण्यात शनिवारी एका कार्यक्रमाला आल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारला केला आहे. देशाचे पंतप्रधान एकदा निवडून आल्यावर ते पक्षाचे नाही तर देशाचे प्रधानमंत्री होतो. अशी आठवण त्यांनी करून देताना, देशाचे पंतप्रधान जर मुंबईत येऊन मुंबईसाठी काहीतरी करणार असतील तर त्याचे मनापासून स्वागत झालेच पाहिजेल. देशाचे पंतप्रधानांचा मानसन्मान हा आम्ही आणि आपण सर्वांनी केलाच पाहिजे असेही त्या म्हणाल्या      शनिवारी ठाण्यात एका मॉल मध्ये बचत गटाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी खासदार सुळे ठाण्यात आल्या होत्या.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी केंद्रसरकार आणि राज्य सरकारवर टीका करत सवाल ही केला आहे. तसेच ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र यांचे सरकार. हे आपण प्रेमाने आदराने म्हणतो. मध्यंतरी या सरकारला ईडी सरकार हे देवेंद्र फडणवीस यांनीच संबोधले होते. राज्यात एकतर दडपशाही आणि प्रलोभन दाखवले जात असल्याचा आरोप करताना, गेले अनेक वर्ष केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये हे पाहिले आहे. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

सध्या प्रलोभन नाही तर दडपशाही ही केली जात आहे असे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडी बाबत विचारले असता आघाडीबाबत चर्चा होईलच तसेच वरिष्ठ नेते मंडळी बसून त्याच्यावर निर्णय घेतील असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच  अंधश्रद्धा विरोधात बोलताना नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेवर आपले उभे आयुष्य खर्च केले ,त्यांची हत्या झाली असे त्या म्हणाल्या. ज्या पद्धतीने वातावरण देशात राज्यात आहे याचा विचार आज सत्तेत असलेल्या लोकांनी केला पाहिजे. त्यातच अशा गोष्टींवर ॲक्शन ही सत्तेत असलेल्या लोकांनीच घेतली पाहिजे किंवा पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे. असा सल्ला ही त्यांनी दिला. तसेच या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेल. 

हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे,शाहू-फुले-आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्राला कालीमा फासणाऱ्या गोष्टी कुठेतरी थांबल्यास पाहिजे. याचा विरोध आपण सर्वांनी करून त्यांच्याविरोधात आपण सर्वांनी लढले पाहिजे. तर अघोरी विद्येचा मी जाहीर निषेध करते असे म्हणताना महिलांचा मानसन्मान झाला पाहीजेल. श्रद्धाही असलीच पाहिजे पण अंधश्रद्धेविरोधात आमचा लढा सातत्याने चालू राहील. ही दाभोळकरांना श्रद्धांजली आणि आदरांजली राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Breaking of BMC's FD is a matter of concern - MP Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.