ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णालयांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:37 AM2021-04-26T04:37:00+5:302021-04-26T04:37:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण- डोंबिवलीत दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढती संख्या पाहता कोरोना ...

Breaks to oxygen-deprived covid hospitals | ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णालयांना ब्रेक

ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णालयांना ब्रेक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण- डोंबिवलीत दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढती संख्या पाहता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. ऑक्सिजन पुरवठा मर्यादित आहे. यावर मात करण्यासाठी हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्याचे दोन प्लांट उभारणार आहे, अशी घोषणा शनिवारी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्याअभावी कल्याण पूर्वेतील मनपाची दोन रुग्णालये सुरू करता आलेली नाहीत. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णालयांअभावी स्थानिक रुग्णांची उपचाराअभावी परवड होताना दिसत आहे.

कोरोनाच्या लढाईत ऑक्सिजन ही सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन रुग्णांचा मृत्यू होण्याच्या काही घटना राज्यात घडल्या आहेत. येत्या काही दिवसात ऑक्सिजनची कमतरता आणखी मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण डोंबिवलीचा आढावा घेता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. एप्रिल महिन्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची संख्या पाहता शनिवापर्यंत तब्बल ३५ हजार ८७७ नवे रुग्ण आढळले आहेत तर २९ हजार १३६ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे ११९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केडीएमसी क्षेत्रात ९४ कोविड रुग्णालये आहेत. यात महापालिकेची सात कोविड केंद्रे आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या २ हजार १९५ च्या आसपास आहे. या रुग्णालयांना ५० मेट्रिक टन मिळतो मात्र तो पुरेसा नाही. राज्यभरात ज्याप्रमाणे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तसा येथील रुग्णांना ऑक्सिजन बेड हाऊसफुल्ल असल्याने अन्यत्र शहरांची वाट धरावी लागत आहे. तसेच खासगी ऑक्सिजन पुरवठादारांकडे धाव घ्यावी लागत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा पाहता आयुक्त सूर्यवंशी यांनी सर्व कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने भरारी पथक नियुक्त केली आहेत. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरेसा मिळतो की नाही पुरवठादाराकडून काय अडचणी आहेत, रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेत गळती आहे का याची तपासणी केली जाणार आहे. याची अंमलबजावणी कितपत काटेकोरपणे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

----------------------------------------------

केडीएमसीला व्हावे लागणार आत्मनिर्भर

दरम्यान, एकीकडे रुग्णालये तुडुंब भरलेली असताना ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी केडीएमसीला त्यांची कल्याण पूर्वेतील दोन रुग्णालये सुरू करता आलेली नाहीत. महापालिकेला याबाबतीत आत्मनिर्भर बनविण्यासाठी भविष्यातील गरज लक्षात घेऊन स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी पूर्व भागात आमदार निधीमधून १ कोटी रुपयांचा निधी तातडीने वर्ग करण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

Web Title: Breaks to oxygen-deprived covid hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.