मीरा भाईंदरच्या पालिका स्थायी समितीच्या चाव्या लाचखोराच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 08:13 PM2020-02-28T20:13:24+5:302020-02-28T20:14:24+5:30

मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपाचे अशोक तिवारी निवडुन आले आहेत. भाजपा नगरसेवकांच्या एका गटाचा विरोध डावलुन तिवारी यांनाच उमेदवारी देण्यात आली.

The bribe of Mira Bhayandar's Municipality standing committee is in the hands of bribe | मीरा भाईंदरच्या पालिका स्थायी समितीच्या चाव्या लाचखोराच्या हाती

मीरा भाईंदरच्या पालिका स्थायी समितीच्या चाव्या लाचखोराच्या हाती

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपाचे अशोक तिवारी निवडुन आले आहेत. भाजपा नगरसेवकांच्या एका गटाचा विरोध डावलुन तिवारी यांनाच उमेदवारी देण्यात आली. तिवारी लाच प्रकरनी रंगेहाथ अटक केलेले आरोपी असुन त्यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव ठाणे प्रांतअधिकारी यांच्या कडे २०१८ पासुन प्रलंबित आहे. भाईंदर पोलीस दप्तरी देखील गुन्हे दाखल असलेल्या प्रमुखां मध्ये मध्ये त्यांचा वरचा क्रमांक आहे. त्यामुळे भाजपा वर टिकेची झोड उठली असुन लाचखोराच्या हाती पालि;का तिजोरीच्या चाव्या दिल्याने खळबळ उडाली आहे.

स्थायी समिती मध्ये भाजपाचे १०, शिवसेनेचे ४ तर काँग्रेसचे २ असे १६ सदस्य नगरसेवक आहेत. स्थायी समिती मध्ये भाजपा कडे स्पष्ट बहुमत आहे. भाजपा सोबत गेलेल्या शिवसेनेच्या फुटीर नगरसेविका अनिता पाटील महापौर निवडणुकी पाठोपाठ आज शुक्रवारच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीला पण गैरहजर राहिल्याने सेना - काँग्रेसच्या महाविकास आघाडी कडे केवळ ५ इतकेच संख्याबळ राहिले. त्यामुळे भाजपाचा उमेदवार जिंकणार हे स्पष्टच होते.

परंतु भाजपा कडुन दिनेश जैन व अशोक तिवारी या दोन्ही माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी भरण्यात आले होते. तर शिवसेने कडुन कमलेश भोईर यांना उमेदवारी देण्यात आली होती. उपमहापौर निवडणुकीत उत्तर भारतिय समाजाचे मदन सिंह यांना डावलल्याने भाजपातील उत्तर भारतिय नगरसेवकांनी अशोक तिवारी यांच्या नावाचा आग्रह धरला होता. अन्यथा वेगळा निर्णय घेऊ असा इशारा दिला होता. तर तिवारी यांच्या नावास जैन सह रवी व्यास, दरोगा पांडे आदी नगरसेवकांच्या गटाचा विरोध असल्याचे सुत्रां कडुन समोर आले होते. बहुतांश भाजपा स्थायी समिती सदस्यांना मेहतांच्या वरसावे येथील हॉटेल सी एन रॉक मध्ये ठेवण्यात आले होते.

आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्या अध्यक्षते खाली सभापती पदाची निवडणुक पार पडली. दिनेश जैन यांनी माघार घेतल्याने तिवारी व भोईर यांच्यात सरळ लढत झाली. तिवारी यांना १० तर भोईर यांना ५ मतं पडल्याने अपेक्षे प्रमाणे भाजपाचे अशोक तिवारी सभापती पदी निवडुन आले. भाजपाचे नेते माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण जातीने हजर होते.

भाजपाने तडीपारीचा प्रस्ताव प्रलंबित असलेल्या लाचखोर नगरसेवकास चक्क पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या दिल्याने भाजपावर टिकेची झोड उठत आहे. भाईंदर पोलीस ठाणे दप्तरी शरिरविरोधी गुन्ह्यात टॉप १० मध्ये तिवारी यांची नोंद होती. त्यांच्यावर ७ गुन्हे दाखल असल्याचे नमुद असुन २०१८ साली भाईंदर पोलीसांनी त्यांना तडिपार करण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हयाचे प्रांतअधिकारी कार्यालयास पाठवलेला आहे. पण राजकिय दबावा पोटी त्यावर निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप होत आहे.

शिवाय प्रभाग समिती सभापती असताना अनधिकृत बांधकामावर कारवाई करायची नसेल तर लाच मागणाराया तिवारी यांना प्रभाग अधिकारायासह दिड लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती असे सांगत आम आदमी पार्टीचे ब्रिजेश शर्मा, सुखदेव बिनबंसी, सामाजिक संस्थेच्या भावना तिवारी , मनसेचे शहरअध्यक्ष हेमंत सावंत आदींनी भाजपा गुन्हेगार आणि भ्रष्टाचारायांना पाठीशी घालत असल्याची टिका केली आहे.

Web Title: The bribe of Mira Bhayandar's Municipality standing committee is in the hands of bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.