बिल मागितल्याने बारमध्ये खुनी हल्ला,दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 02:37 AM2017-09-05T02:37:18+5:302017-09-05T02:37:25+5:30
बिल न देता जाणाºयांना पैसे मागितल्याचा राग आल्याने उल्हासनगरच्या आॅर्केस्टा बारमध्ये दोन ग्राहकांनी मॅनेजरसह वेटरवर चाकूने हल्ला केला.
उल्हासनगर : बिल न देता जाणाºयांना पैसे मागितल्याचा राग आल्याने उल्हासनगरच्या आॅर्केस्टा बारमध्ये दोन ग्राहकांनी मॅनेजरसह वेटरवर चाकूने हल्ला केला. यात वेटर गंभीर जखमी झाला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी काही तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील पवई चौक परिसरात वादातील लॉजिंग-बोर्डिंग आणि आॅर्के्रस्टा बार आहे. त्यातून रविवारी रात्री विशाल बाविस्कर व कुणाल अर्जुन मोरे बिल न देता जात होते. वेटर शिवा गौडासने त्यांच्याकडे बिलाचे पैसे मागितले. त्यावरून त्यांच्यात ‘तू तू मैं मैं’ झाली आणि दोघांपैकी एकाने चाकुने वेटरवर हल्ला केला. त्यामुळे वेटर ओरडू लागला. त्यामुळे मॅनेजर संतोष शेट्टी मदतीला धावला. पण त्यांनी संतोषवरही चाकूने हल्ला केला आणि ते पळून गेले. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी मॅनेजरच्या तक्रारीवरून बाविस्कर व मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तपास करत काही तासात दोघांनाही अटक केली. दोन दिवसापूर्वीच या लॉजिंग-बोर्डिंगमध्ये मध्य प्रदेशातील एका व्यापाºयाचा मृत्यू झाला. त्याचे गूढ उलगडेलेले नाही. याच बारमधून महिन्यापूर्वी अश्लील चाळे करणाºया बारबालांसह ४२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या वादग्रस्त बारमध्ये पुन्हा खुनी हल्ला झाल्याने चर्चा सुरू झाली.