नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:19+5:302021-07-31T04:40:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आधी २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. त्यानंतर उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाला. तशीच परिस्थिती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये झाली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आधी २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. त्यानंतर उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाला. तशीच परिस्थिती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये झाली. मात्र तरीही नोटाबंदी आणि कोरोनाच्या संचारबंदीतही लाचखोरी जोरात असल्याचे आढळले. गेल्या साडेपाच वर्षांत ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीच्या ५२७ तक्रारी आल्या. कोरोनातील दीड वर्षाच्या काळातही ९१ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुळात लाच देणे आणि घेणे हे दोन्हीही बेकायदेशीर आहे; परंतु आपले काम विनाविलंब व्हावे, यासाठी कधीकधी सामान्य नागरिक कायदेशीर किंवा बेकायदेशीर कामे विनाअडथळा होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अगदी महसूल अधिकाऱ्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाचेचे आमिष दाखवितात. काही वेळा याच अधिकाऱ्यांकडून अशा लाचेची मागणी केली जाते. लाच दिली जात नाही तोपर्यंत अडवणूक केली जाते; परंतु नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
* पोलीस आणि महसूल खाते आघाडीवर
सन २०२१ मध्ये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २९ जुलैपर्यंत लाचेची ४६ प्रकरणे दाखल झाली. यात सर्वाधिक आठ केसेस या पोलिसांच्या विरोधातील होत्या. त्यापाठोपाठ महसूल विभाग सात, महानगरपालिकेच्या सहा, तर जिल्हा परिषदेतील पाच लाचखोरांविरुद्ध कारवाई झाली.
* लाच ३०० पासून पाच लाखांपर्यंत...
अ) रिक्षा सोडविण्यासाठी चारशेंची लाच...
माजीवडा येथून नो पार्किंगमधील एक रिक्षा ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस हवालदाराने टोइंग करून नेली होती. ती सोडविण्यासाठी या रिक्षाचालकाकडून चारशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना या पोलीस हवालदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काही दिवसांपूर्वीच पकडले होते.
¯¯¯¯¯जोड आहे.