नवीन ठाण्याला जोडण्यासाठी खाडीवर उभारला जाणार पूल; ठामपासमोर सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:46 AM2020-02-04T00:46:08+5:302020-02-04T06:23:35+5:30

तीन हजार हेक्टरचा विकास

A bridge to be erected on the creek to add a new station; Proposal for appointment of consultant in front of the firm | नवीन ठाण्याला जोडण्यासाठी खाडीवर उभारला जाणार पूल; ठामपासमोर सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव

नवीन ठाण्याला जोडण्यासाठी खाडीवर उभारला जाणार पूल; ठामपासमोर सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून केला जाणार आहे. भविष्यात, या ठिकाणी बिझनेस हब आणि परवडणारी घरे अशा संकल्पनेतून नवीन ठाण्याचा विकास करण्याचा ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए या दोन्ही प्राधिकरणांचा मानस आहे. त्यातही, घरापासून चालण्याच्या अंतरावर काम हीसुद्धा संकल्पना आहे. त्यानुसार, तब्बल तीन हजार हेक्टर जमिनीवर नवीन ठाणे विकसित केले जाणार आहे. त्यासाठी कासारवडवली ते खारबाव असा ४०० मीटर लांबीचा उड्डाणपूल खाडीवर उभारला जाणार आहे. त्याअनुषंगाने या कामासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे.

घोडबंदरपासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर हे नवीन ठाणे विकसित होणार आहे. मागील काही वर्षे नवीन ठाण्याच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली होती. परंतु, त्याचा मुहूर्त सापडत नव्हता. आता खºया अर्थाने मागील वर्षापासून नवीन ठाण्याच्या विकासाला वेग आला आहे. त्यानुसार, खाडीपलीकडे असलेली खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास केला जाणार आहे. नवीन ठाण्याच्या विकासाच्या मार्गातील एकेक अडथळा टप्प्याटप्प्याने दूर होत आहे. त्यानुसार, गायमुख ते खारबाव हा खाडीपूल तयार करण्याच्या हालचालींना खºया अर्थाने वेग आला आहे. या पुलामुळे नवीन ठाणे अगदी ठाणे शहराजवळ येणार आहे. या पुलाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी २०१९ च्या महासभेत मंजूर झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात दळणवळण व्यवस्थेवर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.

एमएमआरडीए अलिबाग ते वसई-विरार असा मल्टिमोडल कॉरिडॉर उभारला जात असून तो नव्या ठाण्यातील खारबाव या गावातून जातो. हा कॉरिडॉर घोडबंदर रोड ते मोघरपाडा येथील ४० मीटर डीपी रस्त्याने जोडण्याची तरतूद एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आहे. त्यामुळे नवीन ठाणे अगदी जवळ येणार आहे. विशेष म्हणजे या नवीन ठाण्याच्या दिशेने मल्टिमोडल कॉरिडॉर जात असल्याने आजूबाजूचे सर्व नॅशनल हायवे जवळ येणार आहेत. ही एक या शहरासाठी मुख्य आणि सर्वात महत्त्वाची जमेची बाजू ठरणार आहे.

या भागात तीन हजार हेक्टरवर नवीन ठाणे वसवले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ७५ हजार परवडणारी घरे निर्माण करण्याचा पालिकेचा मानस असणार आहे. त्यानुसार, नव्या शहराची लोकसंख्या सुमारे चार लाखांच्या घरात जाणार आहे. आलिशान घरे बांधली तर कमी लोकसंख्या येथे सामावली जाणार असून इतर सोयीसुविधांवरसुद्धा ताण येण्याची भीती आहे. त्यामुळे परवडणारी घरे बांधणे, हाच महापालिकेचा मानस राहणार आहे. एमएमआरडीएने या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, १६ छोटीमोठी ग्रोथ सेंटर येथे निर्माण केली जाणार आहेत.

रोजगाराच्या संधीही होणार उपलब्ध

एमएमआरडीएच्या माध्यमातून नवीन ठाण्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. येथे येणाऱ्या कामगारांच्या निवाºयाची जबाबदारी पालिका उचलणार आहे. त्यादृष्टीने दळणवळण व्यवस्था ही महत्त्वाचा भाग मानली जात आहे. त्याअनुषंगाने कासारवडवली ते खारबाव असा खाडीपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामासाठी सल्लागार नेमण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. यासाठी ७२ लाख ६० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. खाडीवर पूल बांधण्याच्या कामाचे सर्वेक्षण करणे, प्रस्ताव तयार करणे आणि पर्यावरण व इतर विभागांची आवश्यक ती परवानगी घेण्याचे पालिकेकडून नेमल्या जाणाºया सल्लागाराच्या माध्यमातून केले जाणार आहे.

Web Title: A bridge to be erected on the creek to add a new station; Proposal for appointment of consultant in front of the firm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.