बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

By अजित मांडके | Updated: December 14, 2024 11:00 IST2024-12-14T11:00:41+5:302024-12-14T11:00:51+5:30

ठामपा क्षेत्रातील नौपाडा, पाचपाखाडी , बी - केबिन, महागीरी, कोपरी,आनंदनगर, गांधीनगर, हाजुरी, किसननगर, लुईसवाडी, अंबिका नगर या भागातील पाणी पुरवठा कमी होईल.

Brihanmumbai Municipal Corporation cuts water supply to Thane Municipal Corporation by 15 percent | बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

ठाणे : १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री ०१.०० वाजता पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्र १ च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे उदंचन केंद्र पिसे येथील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ पंप बंद झाले. त्यांच्या दुरुस्तीचे काम शनिवार,  १४ डिसेंबर व रविवार, १५ डिसेंबर रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे १४ डिसेंबर ते दिनांक १५ डिसेंबर या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे.

यामुळे, रविवार १५ डिसेंबरपर्यंत, ठामपा क्षेत्रातील नौपाडा , पाचपाखाडी , बी - केबीन, महागीरी, कोपरी,आनंदनगर, गांधीनगर, हाजुरी, किसननगर, लुईसवाडी, अंबिका नगर या भागातील पाणी पुरवठा कमी होईल.  तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे.

Web Title: Brihanmumbai Municipal Corporation cuts water supply to Thane Municipal Corporation by 15 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.