लोकार्पयत मनसेची भुमिका पोहचवा - राज ठाकरे यांनी कार्यकत्र्याना दिला कानमंत्र
By अजित मांडके | Published: January 21, 2023 03:16 PM2023-01-21T15:16:22+5:302023-01-21T15:16:36+5:30
सध्या तरी निवडणुका लगेगच लागतील अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी आणि जनतेर्पयत अधिक तर्त्पतेने कामाला लागा असा कानमंत्री मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
ठाणे : सध्या तरी निवडणुका लगेगच लागतील अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी आणि जनतेर्पयत अधिक तर्त्पतेने कामाला लागा असा कानमंत्री मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. लोकार्पयत जा, पक्ष संघटना मजबुत करा असेही त्यांनी सांगितले. टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी मनसेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची येथील शासकीय विश्रमगृहात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी काही महत्वाच्या सुचना केल्या.
ठाण्यातील पदाधिका:यांना स्पुरन मिळावे या उद्देशाने राज ठाकरे एका महिन्यात दोन वेळा ठाण्यात आल्याने पदाधिका:यांना देखील यामुळे बळ मिळाल्याचे पदाधिका:यांचे म्हणने आहे. त्यात त्यांचा हा दुसरा ठाणो दौरा झाला असून आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दौरे राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जात आहेत. ठाण्यात सध्या शिवसेनेचे दोन गट झाल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी मनसेने आधीच व्युव्ह रचना आखण्यास सुरवात केली आहे. या दोघातील भांडणात मतदारांना सक्षम पर्याय देण्याचा विचार मनसेकडून सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांनी देखील ठाण्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. महिनाभरात त्यांची ही दुसरी भेट ठरली आहे. त्यातही शनिवारच्या बैठकीत त्यांच्यातील संयम पदाधिका:यांना देखील भावल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी विभाग प्रमुख आणि इतर महत्वाच्या पदाधिका:यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिका:यांचे कौतुक तर केलेच शिवाय कसे काम सुरु आहे, ठाण्याची परिस्थिती कशी आहे, काय करता येऊ शकते, याची माहिती देखील त्यांनी घेतल्याचे मनसेच्या सुत्रंनी सांगितले. दरम्यान मनसेने ठाण्यात पुन्हा एकदा आपली कंबर कसली असून, त्यादृष्टीने आता एक एक पावले टाकली जात आहेत. परंतु येथील पदाधिका:यांना स्पुरण देण्याचे काम राज ठाकरे यांनी सुरु केले आहे. त्यात निवडणुका लवकर लागतील असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे लोकार्पयत जाऊन मनसेची भुमिका त्यांना सांगा असेही त्यांनी सांगितल्याचे सुत्रंनी सांगितले. या बैठकीला मनसेचे ठाणो - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवि मोरे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.