बेघरांना बीएसयूपीची घरे
By admin | Published: January 25, 2016 01:21 AM2016-01-25T01:21:28+5:302016-01-25T01:21:28+5:30
पोखरण रोड नं. १ च्या रु ंदीकरणामध्ये जी कुटुंबे बेघर झाली आहेत त्या सर्वांना नियमानुसार १२.५ टक्के शुल्क आकारु न बीएसयूपीमध्ये घर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
ठाणे : पोखरण रोड नं. १ च्या रु ंदीकरणामध्ये जी कुटुंबे बेघर झाली आहेत त्या सर्वांना नियमानुसार १२.५ टक्के शुल्क आकारु न बीएसयूपीमध्ये घर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
रु ंदीकरणामध्ये बाधित झालेल्या बेघर कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी आयोजिली होती. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. तसेच बेघर झालेल्या ज्या कुटुंबाची बीएसयूपीमध्ये घर घेण्याची ऐपत नसेल त्यांच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी शहर विकास विभागाचे उप-नगर अभियंता राजन खांडपेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली असून, त्यामध्ये कार्यकारी अभियंता नितीन येसुगडे, बीएसयूपी कक्षाचे समीर शहा यांचा समावेश आहे. ही समिती ऐपत नसलेल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची शहनिशा करु न तसा अहवाल आयुक्तांना सादर करेल.
या रु ंदीकरणामध्ये अधिकृत इमारतीमधील बाधीत झालेल्या व्यवसायिक गाळेधारकांना लोढा संकुलातील गाळे उपलब्ध करु न देणे, ज्या व्यवसायिक गाळ्यांचे स्वरु प खाली दुकान वर मकान किंवा बाहेर दुकान आणि आत मकान असे असल्यास त्यांना दुकानाचा गाळा अथवा राहते घर या दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा राहणार आहे. तर उद्योग आस्थापनांसाठी सुविधा भूखंडांतर्गत उपलब्ध जागेची चाचपणी करु न लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, वर्तकनगर मधील व्यवसायिक गाळे उपलब्ध करु न देताना संबंधीतांकडून रेडीरेकनर प्रमाणे शुल्क आकारावे अथवा २५ टक्के संबंधित व्यापाऱ्यांकडून वसूल केल्यावर ७५ टक्के महापालिकेने भरावे याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले. (प्रतिनिधी)