ठाणे जिल्हा परिषदेच्या लाेकनृत्य स्पर्धेत शहापूरची बौद्धपाडा शाळा जिल्ह्यात अव्वल
By सुरेश लोखंडे | Published: March 22, 2024 06:39 PM2024-03-22T18:39:05+5:302024-03-22T18:39:29+5:30
या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्या अखत्यारीत शाळांच्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा अलिकडेच घेतल्या. येथील एनकेटी सभागृहात पार पडल्या या स्पर्धेत शहापूर तालुक्यातील खातिवली केंद्रामधील बौद्धपाडा या जिल्हा परिषदेने अव्वल क्रमांक मिळवला. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक ताल, सुरात भारुड, गोंधळ प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे.
जिल्हा परिषदेच्या या प्राथमिक शिक्षण विभागाने लोकनृत्य, लोककला, वकृत्व, नाट्य, शैक्षणिक साहित्य निर्मिती या विविध कला गुणांना वाव देणाऱ्या या जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या. त्यात शहापूर प्रमाणेच मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी आदी तालुक्यातून प्रथमक क्रमांक मिळवलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्या हाेत्या.
या शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांची उत्कृष्ठ कला सादर या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात जिल्हास्तरीय या स्पर्धेत शहापूरच्या या खातिवली केंद्रामधील बौद्धपाडा शाळेने प्रथमक क्रमांक पटकवला. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे व प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक संतोष जाधव, संदीप वाकचौरे यांचे सर्वच स्तरातून काेैतूक हाेत आहे.