उल्हासनगर महापालिकेचा ८४३.७२ कोटीचा २६ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर

By सदानंद नाईक | Published: March 23, 2023 07:21 PM2023-03-23T19:21:23+5:302023-03-23T19:21:32+5:30

सन-२०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ८४३.७२ कोटीचा खर्च तर ८४३.२६ कोटीचा अपेक्षित धरण्यात आला आहे.

Budget of Ulhasnagar Municipal Corporation 843.72 Crore 2.6 Lakh balance presented by Commissioner | उल्हासनगर महापालिकेचा ८४३.७२ कोटीचा २६ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर

उल्हासनगर महापालिकेचा ८४३.७२ कोटीचा २६ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर

googlenewsNext

 उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी सन-२०२३-२४ चा कोणतीही दरवाढ व करवाढ नसलेला ८४३.७२ कोटीचा मात्र २६ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रक महापालिका सभागृहात गुरवारी सादर केला. येणाऱ्या अंदाजपत्रकात महापालिका परिवहन बस सेवा, डम्पिंग ग्राऊंड, पाण्याचे स्वतःचे स्रोत, क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरप्रवेशद्वार जवळ पूर्णाकृती पुतळा, डॉ आंबेडकर भवन, सिंधू भवन, दिव्यागसाठी वाढीव मानधन आदी उपक्रम असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 उल्हासनगर महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत, शासनाकडून मिळणारे अनुदान, पंधरावा वित्त आयोग, पायाभूत सुविधा व अमृत योजना, स्वच्छ भारत मिशन आदी उपक्रम विचारात घेऊन सन-२०२३-२४ वर्षाचा महापालिका अंदाजपत्रक सादर केल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. यापूर्वीच्या अंदाजपत्रकानुसार अपेक्षित उत्पन्न मिळाले नसून खर्च मात्र झाल्याने, महापालिकेवर कर्ज वाढत असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली. सन-२०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ८४३.७२ कोटीचा खर्च तर ८४३.२६ कोटीचा अपेक्षित धरण्यात आला आहे.

मालमत्ता कर वसुली-१३६.५० कोटी, विकास व तत्सम शुल्क-३०.२० कोटी, अनधिकृत बांधकामे नियमित करणे यातून ८६.२० कोटी, स्थानिक संस्था कर-२६८.४० कोटी, वाणिज्य पाणी बिल-१२ कोटी, भांडवली अनुदान व कर्ज-१२०.८० कोटी, परवाने शुल्क-२७.६७ कोटी, विविध अनुदाने-२४५.६० कोटी व इतर अनुदाने व उत्पन्न-१६४.३३ कोटी असे एकून ८४३.७२ कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. 

खर्च
 पगार वेतन व निवृत्ती वेतन-२०७.८८ कोटी, एमआयडीसी-५४ कोटी, पाणीपुरवठा कर्जफेड-१५.५० कोटी, पथदिवे-१६.६० कोटी, सार्वजनिक आरोग्य घनकचरा-७५.१४ कोटी, सार्वजनिक बांधकाम-१३४.३० कोटी, प्रभाग समिती-४.२२ कोटी, उद्याने विकास-६.३६ कोटी, अग्निशमन दल-३.४१ कोटी, दवाखाने-१६.९२ कोटी, पाणी पुरवठा बिल-१४६.०१ कोटी, भुयारी गटार योजना-२९.५२ कोटी, शिक्षण मंडळ-४३ कोटी, महिला व बालकल्याण-९.४३ कोटी, परिवहन-१८.५० कोटी, इतर खर्च -१९.३४, पर्यावरण-८ कोटी, अमृत योजना परतफेड ८.५० कोटी असे एकून ८४३.२६ कोटीचा खर्च दाखविण्यात आला आहे. 

महापालिका आयुक्तांनी परिवहन बस सेवा, कर्मचारी वसाहत, डॉ आंबेडकर भवन, सिंधूभवन डम्पिंग ग्राऊंड, प्रवेशद्वार जवळ छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, स्वतःचा पाणी पुरवठा स्रोत असे नावीन्यपूर्ण उपक्रम आहेत. अंदाजपत्रक सादर करतेवेळी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, लेखा अधिकारी किरण भिलारे, उपायुक्त अशोक नाईकवाडे, दिपक जाधव, प्रियांका राजपूत आदीजन होते.

Web Title: Budget of Ulhasnagar Municipal Corporation 843.72 Crore 2.6 Lakh balance presented by Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.