बिल्डर ४ वर्षांनी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:17 AM2018-03-19T05:17:44+5:302018-03-19T05:17:44+5:30
जमीन विकसित करण्याच्या नावाखाली चार वर्षांपूर्वी ठाण्यातील व्यापाऱ्यास २ कोटी ७० लाख रुपयांना फसविणा-या एका बिल्डरला खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. या प्रकरणात एक पोलीस अधिकारीदेखील आरोपी होता.
ठाणे : जमीन विकसित करण्याच्या नावाखाली चार वर्षांपूर्वी ठाण्यातील व्यापाऱ्यास २ कोटी ७० लाख रुपयांना फसविणा-या एका बिल्डरला खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. या प्रकरणात एक पोलीस अधिकारीदेखील आरोपी होता.
कळवा येथील चुन्नीलाल दयालाल कारिया यांची कल्याणमधील वाव्होली येथे २३ एकर जमीन आहे. ही जमीन अकृषक करण्यासाठी कारिया यांच्याकडून आरोपींनी दोन कोटी ७० लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. राबोडी पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपींमध्ये अॅड. राजकुमार उन्हाळे, जितेश विलास मोरे व रमाकांत मोतीराम म्हात्रे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक सकपाळ आणि वैशाली अशोक सकपाळ यांचाही समावेश होता. त्यापैकी आरोपी जितेश विलास मोरे हा बांधकाम व्यावसायिक असून, चार वर्षांपासून तो फरार होता. अखेर ठाण्यातील खारेगाव टोलनाक्याजवळ शनिवारी त्याला बेड्या ठोकल्या.