ठाण्यातील वृद्धेच्या फ्लॅटवर टाळे तोडून बिल्डरने केला बेकायदेशीर कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:42 AM2020-07-09T00:42:47+5:302020-07-09T00:45:57+5:30

ठाण्यातील कारवालोनगर येथील एका वृद्धेच्या फ्लॅटवर बिल्डरने बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी ८० वर्षीय वृद्धेचा मुलगा हेरॉल्ड कारवालो यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बिल्डरविरुद्ध तक्र ार दाखल केली आहे.

Builder breaks locks on old woman's flat in Thane | ठाण्यातील वृद्धेच्या फ्लॅटवर टाळे तोडून बिल्डरने केला बेकायदेशीर कब्जा

पोलिसांनी दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला

Next
ठळक मुद्देकरवालोनगर येथील घटनाठार मारण्याचीही दिली धमकीपोलिसांनी दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जागेच्या मोबदल्यात वयोवृध्द जागा मालकिणीला दहा वर्षांपूर्वी दिलेल्या फ्लॅटवर बिल्डरने बेकायदेशीररित्या टाळे तोडून कब्जा केल्याची घटना ठाण्यातील करवालोनगर भागात घडली आहे. याप्रकरणी ८० वर्षीय वृद्धेचा मुलगा हेरॉल्ड करवालो यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बिल्डरविरुद्ध तक्र ार दाखल केली आहे. पोलिसांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने बुधवारी याप्रकरणी त्यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे दाद मागितली आहे.
कारवालोनगर येथील एका भूखंडावर असलेली जुनी चाळ तोेडून त्याठिकाणी प्राची व प्रतीक्षा कन्स्ट्रक्शनचे मालक रवी आणि प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये सात मजली इमारत बांधली. त्यावेळी जमिन मालक म्हणून सिल्वीनीया कारवालो यांना त्यांनी १८ मे २०१० रोजी दोन फ्लॅट दिले. तशी रितसर नोटरीही करण्यात आली. त्यातील एका फ्लॅटची त्यांनी विक्री केली. तर दुसरा फ्लॅट कारवालो यांनी भाडयाने दिला होता. गेल्या दहा वर्षांत पाच भाडेकरू करवालो यांनी ठेवले. अखेरच्या भाडेकरूने २५ जून २०२० रोजी रितसर करार संपल्याने फ्लॅट रिकामा केला. त्यानंतर कारवालो यांनी आपले टाळे लावून फ्लॅट बंद करून ठेवला. दुसऱ्याच दिवशी दिवशी कारवालो यांच्याकडील कर्मचारी साफसफाईसाठी या फ्लॅटवर गेला तेंव्हा तिथे फ्लॅटचे टाळे तोडून बिल्डर प्रभाकर सावंत यांनी पत्नी आणि दोन मुलींसह जबरदस्तीने तिथे वास्तव्याला आल्याचे आढळले. हा प्रकार समजताच सिल्वीनीया यांचा मुलगा हेरॉल्ड यांनी त्यांना विचारणा केली असता, हा माझा फ्लॅट आहे, मी फ्लॅटचे टाळे तोडून माझा कब्जा केला आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी अरेरावीची उत्तरे त्यांना देण्यात आली.
अखेर हेरॉल्ड यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ जून रोजी धाव घेऊन सावंत यांच्याविरुद्ध कलम ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या सावंत या बिल्डरने यापूर्वीही आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली असून याबाबत आपण अल्पसंख्याक आयोगाकडे तक्र ारही केली आहे, असे हेरॉल्ड कारवालो यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. पोलिसांनी मात्र आता या प्रकरणात न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने दाद तरी कुठे मागायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बिल्डर प्रभाकर सावंत यांच्याशी वारंवार संपर्क साधून ते प्रतिक्रीयेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही.

Web Title: Builder breaks locks on old woman's flat in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.