४० हजार झाडांवर बुलेट ट्रेनकरिता कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:22 AM2018-05-30T01:22:15+5:302018-05-30T01:22:15+5:30

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या तब्बल ४० हजार झाडांवर कुºहाड फिरवण्यात येणार असून त्यापैकी ४३८१ वृक्ष हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत.

Bulb train for 40 thousand trees | ४० हजार झाडांवर बुलेट ट्रेनकरिता कु-हाड

४० हजार झाडांवर बुलेट ट्रेनकरिता कु-हाड

Next

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या तब्बल ४० हजार झाडांवर कुºहाड फिरवण्यात येणार असून त्यापैकी ४३८१ वृक्ष हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्रातील ८३ हेक्टरहून अधिक वनक्षेत्र प्रकल्पाकरिता वापरले जाणार आहे, तर गुजरातमधील केवळ सहा हेक्टर वनक्षेत्र बाधित होत आहे. १८ हेक्टर जमिनीवरील कांदळवन या प्रकल्पामुळे नष्ट केले जाणार आहे.
या प्रकल्पाच्या मार्गात नद्या, खाड्या आणि ३४ तळी असून त्यापैकी काहींचे मार्ग बदलण्यात येतील, तर काही बुजवण्यात येणार आहेत किंवा कसे ते स्पष्ट नाही. एवढे सारे होऊनही पर्यावरणावर या प्रकल्पाचा सुतराम परिणाम होणार नाही, असा दावा संबंधित अधिकारी करत आहेत.
बुलेट ट्रेनचा मार्ग हा ५०८.१७ किमीचा असणार असून सध्या मुंबई-अहमदाबाद प्रवासाकरिता लागणाºया वेळेपेक्षा दोन तास कमी वेळात ही ट्रेन अंतर कापणार आहे. या ट्रेनच्या मार्गातील सर्वात लांबीचा बोगदा ठाण्यात असणार आहे. तो पाण्याखाली ३० मीटर खोल असेल व त्याचे अंतर तब्बल २०.७१ किमी असणार आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण २९ गावे बाधित होणार असल्याची माहिती पर्यावरण अहवालात नमूद केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे ड्रीम प्रोजेक्ट पाच वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. ठाणे खाडीत पाहुणे म्हणून येणाºया फ्लेमिंगोंचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा दावा पर्यावरणवादी करत असले, तरी या अहवालात मात्र या पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्ष्यांना बुलेट ट्रेनपासून धोका होऊ नये, यासाठी योजना आखण्यात आली आहे.
प्रकल्पाकरिता २०७.७७ हेक्टर भूसंपादन केले जाणार असून त्यापैकी ८१.५१ हेक्टर खाजगी जमीन, देखरेख आगार १२६.२६ हेक्टर वनप्रदेश फेरफार १७.३६५८ हेक्टरचे असणार आहे. तर, यामध्ये वनक्षेत्र हे ८३.५५ हेक्टर एवढे असणार असून यामध्ये महाराष्टÑातील तब्बल ७७.४५ हेक्टरचा समावेश आहे. गुजरातमधील केवळ ६.१० हेक्टर क्षेत्राचा यामध्ये समावेश असणार आहे. ठाण्यातील वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने याठिकाणी फेरफार करावा लागणार आहे. परंतु, तो कसा केला जाणार, कुठे केला जाणार, याचा अहवालात उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रकल्पाच्या जमिनीतील माती सुपिक आहे, असेही नमूद केले आहे.

Web Title: Bulb train for 40 thousand trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.