बुलेट ट्रेनविरोध मनसे, राष्ट्रवादीत चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:50 AM2018-05-30T04:50:19+5:302018-05-30T04:50:19+5:30
स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हट्टासाठी बुलेट ट्रेन जिल्ह्यात
ठाणे : स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हट्टासाठी बुलेट ट्रेन जिल्ह्यात आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केला आहे. वेळ पडल्यास जपानच्या पंतप्रधानांना भेटून आम्ही शेतकºयांचा विरोध त्यांच्या कानांवर घालू, असा इशारा मनसेचे पदाधिकारी राजन गावंड यांनी या वेळी दिला. बुलेट ट्रेनच्या जनसुनावणीला विरोध करत ठाणे शहर जिल्हा राष्टÑवादीच्या वतीने गडकरी रंगायतनबाहेर आंदोलन केले. बुलेट ट्रेनला विरोध करणाºया शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यासाठी मनसे आणि राष्टÑवादीमध्ये चढाओढ सुरू असल्याचे मंगळवारी दिसले.
मनसेचे गावंड म्हणाले की, बुलेट ट्रेनच्या विरोधात देशाच्या राष्टÑपतींना साकडे घातले आहे. परंतु, वेळ पडल्यास जपानच्या पंतप्रधानांनादेखील साकडे घातले जाईल. मनसेचे दोनच पदाधिकारी सुनावणीला हजर होते. दुसरीकडे, ठाणे शहर जिल्हा राष्टÑवादीच्या वतीनेदेखील या सुनावणीला विरोध करत रंगायतनच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. शेतकºयांना विश्वासात न घेता संपादन केले जात असल्याने राष्ट्रवादीने विरोध केला.