भिवंडीत बंटी बबली गॅंग सक्रिय; दोन टेम्पो चालकांकडून 2 लाख रुपये लुटले

By नितीन पंडित | Published: September 2, 2022 07:35 PM2022-09-02T19:35:56+5:302022-09-02T19:36:10+5:30

भिवंडीत वाहन चोरी, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच आता भिवंडीत बंटी बबली गॅंग सक्रिय झाली आहे.

Bunty Bubli gang active in Bhiwandi; 2 lakhs looted from two tempo drivers | भिवंडीत बंटी बबली गॅंग सक्रिय; दोन टेम्पो चालकांकडून 2 लाख रुपये लुटले

भिवंडीत बंटी बबली गॅंग सक्रिय; दोन टेम्पो चालकांकडून 2 लाख रुपये लुटले

Next

भिवंडी:भिवंडीत वाहन चोरी, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच आता भिवंडीत बंटी बबली गॅंग सक्रिय झाली आहे. या बंटी बबली गॅंगने बुधवारी पहाटे दोन पिकप टेम्पो चालकांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून दोघांकडून सुमारे दोन लाख रुपयांची जबरी चोरी केली आहे.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश रामनाथ सानप वय ३६ वर्ष व संजय लक्ष्मण बेंडकुळे असे बंटी बबली गॅंगने लुटलेल्या दोघा टेम्पो चालकांचे नाव आहे. योगेश हा पहाटे सव्वा तीन वाजता बुलेरो पिकप गाडीने नाशिककडे जात असताना मुंबई नाशिक महामार्गावर मानकोली नाक्याच्या पुढे असलेल्या ओवळी गावच्या प्रवेशद्वारावर एक अनोळखी पुरुष व महिला मोटर सायकल वरून येऊन त्यांनी योगेशची गाडी रस्त्यातच अडवली.त्यानंतर आमच्या गाडीला कट का मारली असे बोलून अनोळखी पुरुषाने त्याच्याकडील चाकूचा धाक योगेशला दाखवला तर महिलेने गाडीत घुसून योगेशच्या पॅन्ट व मागील खिशात ठेवलेले दहा हजार रुपयांची रोख रक्कम व त्याचा मोबाईल जबरीने हिसकावून पळून गेले. 

या घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनिटातच पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास मानकोली नाका उड्डाण पुलावर संजय बेंडकुळे याची पिकप गाडी अडवून त्यालाही चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील १ लाख ८१ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम या बंटी बबली गॅंगने चोरून नेली आहे.या दोन्ही चोरीच्या घटनेत सुमारे दोन लाखांची रक्कम व मुद्देमाल चोरी प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अनोळखी महिला व पुरुष अशा दोघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bunty Bubli gang active in Bhiwandi; 2 lakhs looted from two tempo drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.