ठाण्यात सराफांना गंडा घालणाऱ्या बंटी- बंबलीला अटक: वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 09:29 PM2019-08-26T21:29:14+5:302019-08-26T21:37:46+5:30

दागिने खरेदीचा बहाणा करीत सराफांना लुबाडणा-या अरुण संचान उर्फ प्रेम उर्फ प्रविण कर्मवीर ढिल्लोड आणि त्याची पत्नी पिंकी (२४) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या बंटी बबलीने अनेकांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Bunty - Bumble arrested for cheating goldsmith in Thane: Wagle Estate Police take action | ठाण्यात सराफांना गंडा घालणाऱ्या बंटी- बंबलीला अटक: वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

चार लाख ३७ हजारांचे दागिने केले हस्तगत

googlenewsNext
ठळक मुद्देदागिने खरेदीचा केला होता बहाणा डोंबिवलीतून केली अटकचार लाख ३७ हजारांचे दागिने केले हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दागिने खरेदी करण्याचा बहाणा करीत सोनाराच्या दुकानात शिरल्यानंतर त्यांना आरटीजीएसद्वारे पैसे देण्याचे सांगून सोने आणि चांदीचे दागिने लुबाडणा-या अरुण संचान उर्फ प्रेम उर्फ प्रविण कर्मवीर ढिल्लोड (२९, रा. डोबिवली) आणि त्याची पत्नी पिंकी (२४) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख ३७ हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
अरुण आणि त्याची पत्नी पिंकी या दाम्पत्याने वागळे इस्टेट, आंबेवाडी येथील ‘महावर ज्वेलर्स’ या दुकानामध्ये ३० जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शिरकाव केला. लग्नासाठी दागिने खरेदीचा बहाणा करून दुकानमालकास दागिने दाखविण्यास भाग पाडले. त्यावेळी वेगवेगळ्या डिझाइन्सचे दागिने दुकान मालक नरेश महावर यांनी दाखविले. या दोघांनीही आपसात संगनमत करून एक लाख १७ हजार ७७१ रुपयांंचे (३१ हजार ८३० ग्रॅम) सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख १७ हजार ७७१ रुपयांची सोनसाखळी, ३४ हजार ५५८ रुपयांच्या सोन्याच्या तीन अंगठ्या आणि काही चांदीचे दागिने असे दोन लाख ५४ हजार ३९९ रुपयांचे दागिने पसंत केले. दागिन्यांच्या पसंतीनंतर आता आपल्याकडे पैसे नसल्याचे अरुण याने सांगितले. त्यावर आरटीजीएसद्वारे पैसे पाठविल्याचा दावाही केला. त्यानंतर मोबाइलवरून आरटीजीएस केल्याचे मेसेज महावर यांना दाखवून या दाम्पत्याने दागिने घेऊन तिथून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महावर यांनी याप्रकरणी १४ आॅगस्ट २०१९ रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. खरेदीच्या वेळी अरुण सचान असे नाव सांगणाºया प्रविण ढिल्लोढ याने ठाण्यातील डॉ. आंबेडकर रोड येथील पत्ता सांगून आधारकार्ड आणि पॅनकार्ड दुसºया दिवशी देतो, असेही सांगितले होते. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस हवालदार व्ही. जी. आंबेकर, पोलीस नाईक के. जी. जाधव, ए. के. बांगर, ए. बी. खेडकर, एन. एम. बांगर आणि एल. सी. गावकर आदींच्या पथकाने तपास करुन डोंबिवलीतील निळजे गावातील या दाम्पत्याचा पत्ता तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोधला. त्यानंतर सतत राहण्याचे ठिकाण बदलणाºया या दोघांनाही खोनी गावातील लोढा प्रिमीया या इमारतीमधून २२ आॅगस्ट रोजी या पथकाने अटक केली. डोंबिवली परिसरातही त्यांनी अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यांच्याकडून ११३.४० ग्रॅम सोन्याचे आणि १४२ ग्रॅम वजनाचे चांदीचे असे चार लाख ३७ हजारांचे दागिने त्यांच्या घरातून हस्तगत करण्यात आले आहे. त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत ठाणे पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

 

Web Title: Bunty - Bumble arrested for cheating goldsmith in Thane: Wagle Estate Police take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.