शेतबांधावर खत योजनेचा बोजवारा, बियाणे, खते पोहोचलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:58 AM2020-06-25T00:58:56+5:302020-06-25T00:59:01+5:30

शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.

The burden of fertilizer scheme, seeds and fertilizers have not reached the farms | शेतबांधावर खत योजनेचा बोजवारा, बियाणे, खते पोहोचलीच नाहीत

शेतबांधावर खत योजनेचा बोजवारा, बियाणे, खते पोहोचलीच नाहीत

Next

वाडा : महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवण्याची अभिनव योजना अमलात आणली. मात्र, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना या योजनेऐवजी कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते आणणे सोयीचे वाटत असल्याने शेतकरी शासनाची योजना न राबवता वैयक्तिक बी-बियाणे व खते घेत असल्याने कृषी विभागाची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून बांधावर बियाणे, खते ही अभिनव योजना लागू केली. या योजनेंतर्गत गावातील १२ ते १५ शेतकºयांनी गट तयार करून या गटातील सहभागी शेतकºयांनी ज्याला जेवढे बियाणे, खते लागतात, त्याप्रमाणे मागणी करून पैसे जमा करून सर्व शेतकºयांनी एकदाच खते, बियाणे कृषी पर्यवेक्षकाच्या साहाय्याने खरेदी करायचे. त्यामुळे वाजवी दरात शेतकºयांना शेतीमाल मिळून वाहतूक खर्चाची बचत होते. या योजनेतून शेतकºयांना कुठलेच अनुदान मिळत नाही. तसेच, १२ ते १५ शेतकºयांना एकत्र आणून त्यांचा गट तयार करणे, त्यांची मागणी नोंदवणे, हे अवघड असल्याने शेतकरी ते न करता स्वत:च जाऊन कृषी सेवा केंद्रावरून बियाणे व खते खरेदी करताना दिसून येत आहेत.
वाडा तालुक्यातील खरिवली, पालसई, आमगाव, केळठण, पाली, आंबिस्ते, गोºहे, चिंचघर, उज्जैनी, कुडूस, गुहीर, कोना, गारगाव, तिळसा, नेहरोली, परळी, मांडवा, खानिवली, मानिवली, वाडा आदी २० गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली असल्याचे केवळ कागदी घोडे रंगवण्याचे काम तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पेरण्या संपत आल्या तरी शेतकºयांच्या बांधावर बियाणे व खतांचा पत्ताच नाही. प्रत्येक शेतकºयाने बियाणे, खते आणून पेरण्या केल्याने या योजनेचा वाड्यात बोजवारा उडालेला आहे. या योजनेची अंमलबजावणी करणारे मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे शेतावर ढुंकूनही बघत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कुडूस मंडळात घोणसई, मेट, नारे, वडवली, कोंढले, दिनकरपाडा, मुसारणे, सापरोंडे, उसर, उचाट ही गावे येत असून या एकही गावात बांधावर बियाणे, खते मिळाली नसल्याचे अनेकांनी सांगितले.
>मोहोट्याचापाडा गाव कुडूस मंडळात येत असून या गावात कृषी सहायकांनी शेतकºयांना याबाबतची माहिती न दिल्याने येथील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत, असे शेतकरी भास्कर दुबेले यांनी सांगितले. तर, आघाडी सरकार बांधावर खते, ही योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा अरोप भाजपचे नेते मंगेश पाटील यांनी केला आहे.
>वाडा तालुक्यात या योजनेंतर्गत २१० क्विंटल बियाणे आणि ३९० टन खत बांधावर गेले आहे.
- एल.के. राऊत, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

Web Title: The burden of fertilizer scheme, seeds and fertilizers have not reached the farms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.