घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:58 PM2024-05-08T19:58:44+5:302024-05-08T19:59:27+5:30

चोरी केलेले २५ लाखांचे ४९६ ग्रॅम सोने हस्तगत

Burglary theft accused arrested | घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक

घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक

नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहरातील वाईन शॉपमध्ये घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेले २५ लाख ८ हजार ७९६ रुपयांचे ४९६ ग्रॅम सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आरोपीवर ५० गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहेत. १४ मे पर्यंत आरोपी पोलीस कोठडीत असून दोन फरार साथीदारांचा शोध घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्रीप्रस्था येथील लोटस अपार्टमेंटमध्ये जिमखाना नावाचे वाईन शॉप आहे. ७ डिसेंबरला रात्री या वाईनशॉपच्या शटरची कडी व सेंटर लॉक तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानाच्या काऊंटर मधील व ऑफिसच्या तिजोरीत असलेले सोने, हिरे, माणिक मोती, रोख रक्कम चोरी करून नेले होती. आगाशी क्रॉस नाका येथे राहणारे मनोज कामत (५६) यांनी २३ डिसेंबरला नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे व परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. घटनास्थळावरील प्राप्त पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून गुन्हा हा एका अनोळखी मास्क लावलेल्या इसमाने केल्याची माहिती मिळाली. आरोपीच्या मोडसप्रमाणे गुन्हे करणाऱ्या आरोपीची माहीती संकलित करून अशाप्रकारे चोरी करणारा आरोपी रामनिवास मंजु गुप्ता याची माहीती मिळाली. आरोपीचा त्याचे घरी जाऊन शोध घेतल्यावर तो घरी मिळून आला नाही. त्याचे घरझडतीत त्याने घटनास्थळावर वापरलेला शर्ट मिळून आला. त्यावरुन तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी फोन वापरणे बंद करुन तो त्याचे राहणेचे ठिकाण बदलून दुस-या ठिकाणी राहण्यास होता व तो चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात, जिल्हयात फिरत असतांना त्यास जे.पी. रोड पोलीस ठाणे, गुजरात यांनी पकडले. आरोपीने गुन्हयाची कबूली देऊन गुन्हयातील मालमत्ता दाखविण्यासाठी पोलीसांना ठाणे येथे घेऊन आला असतांना पोलीसांची नजर चुकवून तो पळून गेला होता. या आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली होती. आरोपीचा नमुद गुन्हयात ताबा घेऊन त्याचेकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात गुन्हयात २५ लाख ८ हजार ७९६ रुपयांचे ४९६ ग्रॅम सोन्याचे दागिने, लगड हस्तगत करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल,   पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, अख्तर शेख, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, नामदेव ढोणे, साहिल शेख यांनी केली आहे.
 

Web Title: Burglary theft accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.