लाचखोर वाहतूक पोलीस उपनिरीक्षकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 19:59 IST2018-10-12T19:54:03+5:302018-10-12T19:59:59+5:30
ठाणे : ओडीसी वाहनास नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता पाच हजारांच्या लाचेची मागणी करून ती घेताना शुक्रवारी ठाणे शहर वाहतूक शाखेचे ...

लाचखोर वाहतूक पोलीस उपनिरीक्षकास अटक
ठाणे : ओडीसी वाहनास नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता पाच हजारांच्या लाचेची मागणी करून ती घेताना शुक्रवारी ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम सुखदेव पाटील (५४) याला ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठाणे शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्तांच्या कार्यालयीन आवारात रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांच्या कंपनीच्या ओडीसी वाहनास वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाचे मार्गस्थ नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे होते. ते देण्यासाठी पाटील याने तक्रारदारांकडे आठ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. त्याचदरम्यान, तक्रारदारांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार, एसीबीने सापळा रचून त्यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक सलील भोसले करत आहेत.
.....................................