आगीच्या घटनेत २४ विद्युत मीटर बॉक्स जळून खाक; अडकलेल्या ३५ जणांची सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 10:05 PM2021-03-14T22:05:57+5:302021-03-14T22:09:54+5:30

कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील विद्युत मीटर बॉक्सला लागलेल्या आगीची घटना ताजी असताना कळव्यात पुन्हा टोरेंट कंपनीच्या २४ घरगुती वापराच्या विद्युत मीटर बॉक्स आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

Burn 24 electric meter boxes in case of fire; 35 trapped people safely released | आगीच्या घटनेत २४ विद्युत मीटर बॉक्स जळून खाक; अडकलेल्या ३५ जणांची सुखरूप सुटका

कोणतीही जीवितहानी नाही

Next
ठळक मुद्देकोणतीही जीवितहानी नाहीआगीमुळे इमारतीत प्रचंड धूर

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील विद्युत मीटर बॉक्सला लागलेल्या आगीची घटना ताजी असताना कळव्यात पुन्हा टोरेंट कंपनीच्या २४ घरगुती वापराच्या विद्युत मीटर बॉक्स आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण आगीमुळे अडकलेल्या सुमारे ३५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती ठामपा सूत्रांनी दिली.
कळवा,येथील सहकार बाजारपेठ मार्केट परिसरातील एस पी सोसायटीच्या तळ मजल्यावर टोरेंट कंपनीचे मीटर बॉक्स आहेत. या बॉक्सला शनिवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती समजताच, ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, टोरेंट कंपनी आणि कळवा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एक फायर वाहन आणि दोन रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. आगीमध्ये इमारतीच्या तळमजवरील २८ मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. दरम्यान, या आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर झाला होता. तसेच ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून यामध्ये कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: Burn 24 electric meter boxes in case of fire; 35 trapped people safely released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.