ठाण्यात लागलेल्या आगीत ३२ मीटर बॉक्स जाळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 11:34 AM2021-03-09T11:34:41+5:302021-03-09T11:34:59+5:30
Fire broke out in thane: आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १ फायर वाहन आणि १ रेस्क्यू वाहन पाचारण केले. या आगीत त्या इमारतीच्या तळ मजल्याला असलेले ३२ मीटर आगीत जाळून खाक झाले.
ठाणे: कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील मीटर बॉक्सला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यामध्ये त्या इमारतीमधील ३२ मीटर बॉक्स जाळून खाक झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठामपा सूत्रांनी दिली.
कळवा, मनीषानगर २ येथे सुधाम कृष्णा इमारतीच्या तळ मजल्यावर टोरेंट कंपनीचे मीटर बॉक्स आहेत. या बॉक्सला सोमवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती समजताच, ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, टोरेंट कंपनी आणि कळवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १ फायर वाहन आणि १ रेस्क्यू वाहन पाचारण केले. या आगीत त्या इमारतीच्या तळ मजल्याला असलेले ३२ मीटर आगीत जाळून खाक झाली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून यामध्ये कोणीही जखमी झाला नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.