बारवीचे जंगल वणव्यात जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:28+5:302021-03-15T04:36:28+5:30

मुरबाड : तालुक्यातील चारही वनपरिक्षेत्रातील जंगले जळून खाक होत आहेत. सध्या जंगलात वणव्यांची मालिका सुरू झाली आहे. जंगल जळत ...

Burn the forest of Barvi in the forest | बारवीचे जंगल वणव्यात जळून खाक

बारवीचे जंगल वणव्यात जळून खाक

Next

मुरबाड : तालुक्यातील चारही वनपरिक्षेत्रातील जंगले जळून खाक होत आहेत. सध्या जंगलात वणव्यांची मालिका सुरू झाली आहे. जंगल जळत असताना त्यांच्या जवळ असणारे खासगी वनक्षेत्र मात्र सुरक्षित आहे. त्यामुळे वनखात्याच्या जंगलात लागणाऱ्या वणव्यांमागे संशयाचा धूर असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

एकदा उन्हाळा सुरू झाला की, मुरबाड तालुक्यातील जंगलात वणवे लागायला सुरुवात होते. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे. यामागील नेमके प्रकरण काय आहे ते अद्यापही उजेडात आलेले नाही. बाजूला खासगी वनक्षेत्र असताना नेमकी वनखात्याच्या जंगलांमध्येच वणवे कसे लागतात याचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. वनखात्यामार्फत पावसाळ्यात वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड केली जाते. खड्डे खोदणे, रोपांची देखभाल करणे, त्यांना पाणी देण्यासाठी मजूर, ट्रॅक्टरची व्यवस्था करणे, वणवे लागू नयेत किंवा या रोपांचे जनावरे, मनुष्य यांनी नुकसान करू नये म्हणून वनव्यवस्थापन समितीच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षारक्षक नेमणे, या सर्व बाबींवर प्रत्येक वन परिक्षेत्रात दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात.

उंच टेकड्या, डोंगराळ, दुर्गम भागातील जंगलात हा उपक्रम राबविला जातो. तो नेमका कशा प्रकारे राबविला जातो याची कुठेही प्रसिद्धी होत नसली तरी उन्हाळ्यात याच ठिकाणी नेमके वणवे लागतात. नेमके ज्या ठिकाणी लागवड केलेली असते तेथेच वणवे लागतात. यावर्षीही मुरबाड तालुक्यातील सर्व जंगले जळू लागली आहेत. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारवी धरण परिसरात वणवा लागला असताना या परिसरात एकही वन कर्मचारी, अधिकारी फिरकला नाही. परिणामी संध्याकाळपर्यंत हे सर्व जंगल जळून खाक झाले. या जंगलात अनेक दुर्मीळ वनौषधी सापडतात, त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांचा वावर आहे.

Web Title: Burn the forest of Barvi in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.