CoronaVirus News : व्यावसायिकांनी बदलले व्यवसाय, पाणीपुरीवाला विकतोय कांदे-बटाटे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:23 AM2020-06-22T00:23:38+5:302020-06-22T00:23:56+5:30

आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी काही व्यावसायिक आपला मूळ व्यवसाय बदलून व्यवसाय करत असल्याचे दृश्य बाजारपेठांमध्ये दिसत आहे.

Businesses changed, Panipuriwala sells onions and potatoes | CoronaVirus News : व्यावसायिकांनी बदलले व्यवसाय, पाणीपुरीवाला विकतोय कांदे-बटाटे

CoronaVirus News : व्यावसायिकांनी बदलले व्यवसाय, पाणीपुरीवाला विकतोय कांदे-बटाटे

Next

कुमार बडदे 
मुंब्रा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक पार मेटाकुटीस आले होते. आता अनलॉक-१ मध्ये काही निर्बंध शिथिल झाले असले, तरी राज्य सरकारने अद्याप काही व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी काही व्यावसायिक आपला मूळ व्यवसाय बदलून व्यवसाय करत असल्याचे दृश्य बाजारपेठांमध्ये दिसत आहे.
अनलॉक-१ मुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु, अनलॉकमध्ये अद्यापही हॉटेल व्यावसायिकांना पूर्णपणे हॉटेल उघडण्याची तसेच पाणीपुरीसारख्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हे व्यावसायिक व्यवसायाचे स्वरूप बदलून व्यवसाय करत आहेत.
लॉकडाऊनच्या आधी पाणीपुरी, शेवपुरी, भेळ विकणारे विक्रेते सध्या कांदे, बटाटे विकत आहेत. तर, काही हॉटेल व्यावसायिक गहू, तांदूळ, डाळी आदी किराणा सामान अथवा आंबा, पपई, सफरचंद आदी फळांची विक्री करत आहेत.
लॉकडाऊनदरम्यान आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली होती. त्यामुळे झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी व्यवसाय बदलावा लागला आहे.
पाणीपुरीच्या व्यवसायासाठी दुकान भाड्याने घेतले होते. किमान त्याचे भाडे भरण्यासाठी तरी तूर्तास कांदे, बटाटे विकण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती व्यावसायिक मोहम्मद हैदर याने ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Businesses changed, Panipuriwala sells onions and potatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.