ठाण्यातील कॅडबरी ते उपवनच्या ३५ कोटींच्या रस्त्यावर खड्डा : मनसेने दिली ४८ तासांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:12 PM2018-01-12T22:12:54+5:302018-01-12T22:36:27+5:30

ठाण्यातील कॅडबरी कंपनी ते उपवन दरम्यान अनेक अतिक्रमणे हटवून पालिकेने वर्षभरापूर्वीच करोडो रुपये खर्चून रस्ता तयार केला. मात्र, या रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला आहे.

Cadbury in Thane, on the road of 35 crores of the park, pit: MNS has given 48 hours time | ठाण्यातील कॅडबरी ते उपवनच्या ३५ कोटींच्या रस्त्यावर खड्डा : मनसेने दिली ४८ तासांची मुदत

आंदोलनाचा इशारा

Next
ठळक मुद्दे३५ कोटींचा रस्ता तरीही खड्डामनसेने फलक लावून लक्ष वेधलेरस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ठाणे : ठाणे महापालिकेने उपवन ते कॅडबरीदरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी ३५ कोटींचा खर्च करूनही त्या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे. यावर पालिकेने ४८ तासांमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे. ही दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वीच ३५ कोटींच्या खर्चातून कॅडबरी कंपनी ते उपवनपर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेने तयार केला. यासाठी या मार्गावरील अनेक अतिक्रमणेही पालिकेने हटवली. या मार्गावरील बहुतांश रस्ता हा सिमेंटचा केला आहे. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या वाहिनीवरील पुलाच्या मार्गावरच मोठा खड्डा पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वर्तकनगरनाका येथे लोकमान्य लंच होम हॉटेलसमोर गेल्या १० ते १५ दिवसांपासून पडलेल्या या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या ठाणे विधानसभा (सांस्कृतिक विभाग) अध्यक्ष प्रसाद भांदिगरे आणि वर्तकनगर शाखाध्यक्ष संतोष निकम यांनी व्यक्त करून तो तातडीने दुरुस्त करण्याची मागणी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात घडून कोणतीही दुर्घटना झाल्यास त्यास वर्तकनगर प्रभाग समितीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित अधिकारी हे जबाबदार असतील. त्यामुळे हा खड्डा ४८ तासांमध्ये बुजवला गेला नाही, तर मनसे हा खड्डा बुजवण्याचे काम करेल, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, जुन्या पुलाचा भाग खचल्याने हा खड्डा पडल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले असून रस्त्याच्या दुरुस्तीची कार्यवाही सुरू केल्याचे पत्रही मनसेला १२ जानेवारी रोजी वर्तकनगर प्रभाग समितीने दिले आहे.

प्रत्यक्षात या ठिकाणी पालिकेने केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा फलक लावला असून कामाला कोणतीही सुरुवात केली नसल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. रेमण्ड कंपनीजवळ वृक्षवल्ली कार्यक्रम तसेच उपवन परिसरातही आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. अशा वेळी या खड्ड्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जात असून पालिका प्रशासनाची यात नाचक्की होत असल्याचेही मनसेने म्हटले आहे.

Web Title: Cadbury in Thane, on the road of 35 crores of the park, pit: MNS has given 48 hours time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.