कै. डॉ. वा. ना. बेडेकर जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ ठाण्यात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:07 PM2018-02-12T17:07:52+5:302018-02-12T17:15:32+5:30
विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त मंडळाच्यावतीने वर्षभर कार्यक्रम घेतले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी होत आहे.
ठाणो: कै. डॉ. वा. ना. बेडेकर जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ शनिवार 17 फेब्रुवारी रोजी सायं. 6 ते 8 यावेळेत डॉ. बेडेकर विद्या मंदिर, विष्णूनगर, नौपाडा, ठाणो येथे होणार आहे अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्थेतील आजी - माजी मुख्याध्यापक आणि प्राचार्य तसेच, डॉ. वा.ना. बेडेकर यांच्या कुटुंबियांच्या डॉक्टरांच्या संदभार्तील आठवणी जागविणा:या मुलाखती होणार आहेत. डॉ. बेडेकर विद्या मंदिराचे माजी प्राचार्य अशोक चिटणीस हे मुलाखतकार असतील. कार्यक्रमाचे स्वागतगीत सुमेधा बेडेकर आणि ईशस्तवन अनिरुद्ध जोशी सादर करणार आहेत. समारोप डॉ. विजय बेडेकर करणार असून सुत्रसंचालन सुमिता माने करतील. याच समारभात डॉ. वा. ना. बेडेकर यांची व्यक्तिवैशिष्टय़े चित्रित करणारी स्मरणिकांही प्रकाशित होणार आहे. त्याचप्रमाणो त्यांच्या संदभार्तील कॉफी टेबल बुक ही शाळेचे माजी विद्यार्थी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते प्रकाशित होणार असल्याचे यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेत डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या कार्याचा धावता आढावा घेण्यात आला. शाळेच्या माजी विद्याथ्र्यानी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले आहे.