श्री समर्थ सेवक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कै. नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धेत यंदा मुंबईची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:00 PM2018-10-02T17:00:05+5:302018-10-02T17:02:31+5:30
महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी कै. नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.
ठाणे : श्री समर्थ सेवक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कै. नी. गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात कनिष्ठ आणि पदवी अशा दोन्ही गटांत मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कनिष्ठ गटात वि. ग. वझे महाविद्यालयाचा अभय आळशी तर पदवी गटात के. सी. महाविद्यालयाची प्रज्ञा पोवळे हिने प्रथम क्र मांक पटकावला.
शिवदौलत सभागृह येथे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कनिष्ठ गटात स. प. महाविद्यालय, पुणे येथील ईश्वरी सोनावणे हिला दुसरे तर सातारा येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या अमृत भिसे यास तिसरा क्र मांक मिळाला. ईश्वरी सोनावणे हिला नियोजित भाषणासाठी तर अभय आळशी याला उत्स्फूर्त भाषणासाठी विशेष पारितोषिक देण्यात आले. पदवी गटात साठ्ये महाविद्यालयाच्या प्रज्ञा सावंत हिला दुसरा तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या जयंतकुमार काटकर याला तिसरा क्रमांक मिळाला. नियोजित भाषणासाठी प्रज्ञा पोवळे हिला तर उत्स्फूर्त भाषणासाठी स. प. महाविद्यालयाची रिसका कुलकर्णी हिला विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. विद्याधर जोशी, डॉ. दीपिका दाबके, निलेश बागवे आणि जाई वैशंपायन यांनी काम पाहिले. राज्यभरातून दोन्ही गटांत ८५ स्पर्धक सहभागी झाले होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक श्री समर्थ सेवक मंडळाचे अध्यक्ष अनिल हजारे यांनी केले तर परिक्षकांचा परिचय स्पर्धा चिटणीस डॉ. चैतन्य साठे आणि समिती सदस्या पुर्णिमा जोशी यांनी करु न दिला. पारितोषिकांचे वाचन समिती सदस्य योगेश भालेराव यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.