कालगुडेचा वाहन परवाना निलंबित
By admin | Published: March 18, 2016 02:44 AM2016-03-18T02:44:07+5:302016-03-18T02:44:07+5:30
शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे याचा वाहन परवाना अखेर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) निलंबित केला आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो न्यायालयात
ठाणे : शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे याचा वाहन परवाना अखेर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) निलंबित
केला आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट उपशाखेच्या महिला पोलीस हवालदार २५ फेब्रुवारी रोजी नितीन कंपनीजवळ कार्यरत होत्या. याचदरम्यान, दुपारी कालगुडे हा तेथून जाताना सिग्नल सोडल्यावर गाडी रस्त्यात उभी करून मोबाइल फ ोनवर बोलत होता. याबाबत, तिने त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली. त्याचाच राग मनात धरून त्याने तिला मारहाण तिचा करून विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक झाली.
या वेळी त्याचे वाहनही जप्त केले. याचदरम्यान, या मारहाणीची दखल महिला आयोगाने घेतली. तसेच या प्रकरणाचा तपास
नौपाडा पोलिसांकडून वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला. तसेच वाहतूक विभागाने कालगुडे याचा वाहन परवाना
रद्द करण्याची मागणी ठाणे
प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाकडे केली होती. त्यानुसार, त्याला ठाणे आरटीओने नियमानुसार, ९ ते १६ मार्च २०१६ अशी आठ दिवसांची नोटीस बजावली
होती. त्यानुसार, तिची मुदत
संपल्याने त्याचा परवाना निलंबित झाला आहे. (प्रतिनिधी)