मतदारनोंदणी मोहिमेचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:32 PM2019-02-24T23:32:31+5:302019-02-24T23:32:44+5:30

विशेष शिबिराचा उडाला बोजवारा : मतदारयादी, अर्जांसह मतदान केंद्र कर्मचारी बेपत्ता

Campaign of the voters | मतदारनोंदणी मोहिमेचा फज्जा

मतदारनोंदणी मोहिमेचा फज्जा

Next

मीरा रोड : निवडणूक आयोगाने शनिवार व रविवार असे दोन दिवस आयोजित केलेल्या मतदारनोंदणी विशेष शिबिरातील बहुतांश मतदान केंद्रांत मतदारयादी, नमुना अर्जांसह केंद्रस्तरीय अधिकारीसुद्धा बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यामुळे विशेष शिबिराचा शहरात बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी नवमतदारांना मिळावी तसेच अचूक मतदारयादी तयार व्हावी, यासाठी आयोगाने शनिवार व रविवार असे दोन दिवस प्रत्येक मतदान केंद्रात विशेष शिबिराचे आयोजन केले होते. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांत प्रत्येकी दोन केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघाच्या अखत्यारित येणाºया प्रमुख ५१ केंद्र इमारतींत, तर ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मीरा-भार्इंदरच्या हद्दीत येणाºया सुमारे २५ केंद्रांत शनिवार व रविवार अशी दोन दिवस ही मोहीम होती.


सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नियुक्त अधिकाºयाने मतदान केंद्रात हजर राहणे आवश्यक होते. केंद्रात येथील मतदारयादी, नवीन मतदारनोंदणीसाठी अर्ज नमुना क्र. ६, स्थलांतरित वा मयत मतदारांची नावं वगळण्यासाठी अर्ज नमुना क्र. ७, प्रारूप यादीतील तपशिलात दुरुस्तीसाठी अर्ज नमुना क्र. ८ व पत्ता बदलण्यासाठी ८अ उपलब्ध असतील, असे आयोगाने जाहीर केले होते. प्रत्यक्षात, मतदारयादीच बहुतांश केंद्रांवर नव्हती. इतकेच काय, सर्व नमुना अर्जसुद्धा नव्हते. महत्त्वाचे म्हणजे, शिबिरात केंद्रस्तरीय अधिकारीसुद्धा हजर नव्हते. मतदान केंद्रात विशेष शिबिर आहे, याची माहिती असणारा एकही फलक दर्शनी भागात नव्हता. त्यामुळे बहुतांश लोकांना याची माहिती नव्हती.


भार्इंदर येथील जागरूक नागरिक नंदकिशोर बडगुजर हे नाझरेथ शाळा मतदान केंद्रात गेले असता, तिथे असे विशेष शिबिरच नसल्याचे सांगण्यात आले. बडगुजर तेथून भार्इंदर सेकंडरी शाळेत गेले असता, तेथे दोन कर्मचारी दिसले; पण मतदारयादी, सर्व नमुना अर्जच नव्हते. तेथून बडगुजर हे पोद्दार शाळेत गेले असता, तिथे कर्मचारीच नव्हते. रिकाम्या खुर्च्या आणि एका खुर्चीवर ६ व ८ क्रमांकांचे मोजकेच अर्ज होते. रखवालदाराने सकाळी कर्मचारी येऊन गेले, ते अजून आले नसल्याचे सांगितले.
पोरवाल शाळेतसुद्धा चिटपाखरू नव्हते. कोणीच आले नाही, असे शाळेच्या रखवालदाराकडून सांगण्यात आले. इंदिरा कोठारसमोरील सेंट झेवियर्स शाळेत एक कर्मचारी दुपारनंतर आला होता. तेथेसुद्धा यादी व सर्वच नमुना अर्ज नव्हते. ९० फूट मार्गावरील डॉन बॉस्को शाळेतसुद्धा कोणीच नव्हते.


मुलाचे नाव मतदारयादीत नोंदवण्यासह स्वत:चा यादीतील चुकीचा पत्ता बदलण्यासाठी बडगुजर यांनी नाझरेथ शाळेच्या मतदान केंद्रातून सुरू केलेली शोधमोहीम भार्इंदर पश्चिम भागातील निम्मी केंदे्र पालथी घालून झाली तरी थांबली नाही. मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारनोंदणी अधिकारी गुरव यांच्या कानावर घडला प्रकार घातल्यानंतर, त्यांनी सर्व केंद्र अधिकाºयांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निरोप पाठवून केंद्रांवर तातडीने हजर होण्यास बजावले.

दांडीबहाद्दर कर्मचाºयांवर फौजदारी करणार
हा गंभीर प्रकार मतदार नोंदणी अधिकारी गुरव यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्यांनी आपण पाहणीसाठी येत असल्याचे सर्व कर्मचाºयांना व्हॉट्सअ‍ॅपद्धवारे कळविल्याने अनेकांची तारांबळ उडाली. नाझरेथ व सेंट झेवियर्स शाळांतील केंद्रांवर धावतपळत अधिकारी हजर झाले. जे कर्मचारी केंद्रावर नव्हते, याची माहिती घेऊ. वेळ पडल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू, असे गुरव यांनी सांगितले.


शहरातील बहुतांश केंद्रांवर हीच स्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले असून मीरा-भार्इंदरमधील सर्व विशेष मतदारनोंदणी शिबिरांच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हींची पडताळणी करण्याची व सखोल चौकशीची मागणी या प्रकाराचा अनुभव आलेल्या नंदकिशोर बडगुजर यांनी केली आहे. शासनाचे काही कोटी रुपये यात वाया गेले असून लोकांना याची माहितीही नव्हती. निष्काळजीमुळे शिबिराचा फारसा फायदाच झाला नाही.

Web Title: Campaign of the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.