२०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर प्लास्टिकपासून का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 06:58 AM2020-01-20T06:58:51+5:302020-01-20T06:59:28+5:30

पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही

Can be freed from slavery form 200 years, so why not plastic? | २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर प्लास्टिकपासून का नाही?

२०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर प्लास्टिकपासून का नाही?

Next

मीरा रोड : पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही, असा सवाल करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले.

भार्इंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची समस्या व संधी यावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले गेले होते. देशातील १६ राज्यांमधून २०३ जणांनी यात सहभाग घेतला होता. रविवारी राज्यपालांच्या उपस्थितीत या चर्चासत्राचा समारोप झाला. उद्योगपती निरंजन हिरानंदानी, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, रेखा महाजन, रवींद्र साठे, उमेश मोरे, रवी पोकरणा, आमदार गीता जैन आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल म्हणाले की, पूर्वी प्लास्टिक नव्हते, तेव्हा आपण जगतच होतो. पण आज प्लास्टिक जीवनाचा एक भाग बनला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या नव्हत्या तेव्हा काच, धातूच्या बाटल्या होत्याच. मग आता का नाही प्लास्टिकशिवाय जगू शकत? आपल्याला जीवनशैलीत आणि सवयीत बदल करावा लागेल. प्लास्टिकबंदीमुळे रोजगार बुडेल हा विषय बाजूला ठेवा. उद्योगपतींना रोजगार बंद होईल म्हणून काळजी नसते. त्यांना भिती त्यांचा उद्योग बंद होणार, याची असते. तंबाखू बंदीच्या समितीवर असताना तंबाखू उत्पादनापासून बीडी बनवणे आदी कामात लाखो शेतकरी व बीडी मजुरांचा प्रश्न होताच. पण त्याचा लाखावा हिस्साही प्लास्टिकबंदीमुळे बाधित होणार नाही. प्लास्टिक व्यवसायात काम करणाºया कामगारांना दुसरे काम देता येऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकबंदीआड रोजगाराचा विषय बाजूला ठेवा.
आपल्याकडे हुशार लोकं आहेत. त्यांनी सरसकट प्लास्टिक बंदी केलेली नसून, केवळ एकदा वापरल्या जाणाºया प्लास्टिक वस्तुंना बंदी केली आहे. गायींना प्लास्टिक खाल्याने खुप त्रास होतो. त्यामुळे प्लास्टिक न वापरण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वदेशी चळवळ झाली तर आपण स्वदेशी वस्तुंकडे वळलो. पंतप्रधानांनी स्वच्छतेचा संदेश दिला, तो अगदी खेड्या पाड्यात पोहचला. घराघरात शौचालयाचा संकल्प केला, तर ८ कोटीपेक्षा जास्त शौचालयं घराघरात बांधली गेली. २०० वर्षांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त होऊ शकतो तर आता आलेल्या प्लास्टिकपासून मुक्त का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.
या शिबीरानंतर प्लास्टिक बंदी - वापराबाबत म्हळगी प्रबोधिनी आचारसंहिता बनवणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपल्या जगण्यातून प्लास्टिक बाजूला काढू. हे देशासाठी मोठे योगदान ठरेल, असे सांगत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. प्लास्टिक वापराबाबत दोन महिन्यात आचारसंहिता तयार करुन जनजागृती करणार असल्याचे विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले. तर, प्लास्टिकचा वापर आणि ते नष्ट कसे करतो, हे महत्वाचे आहे, असे हिरानंदानी म्हणाले.

‘महाराष्ट्रात राहतो, तर मराठी शिकावे’

ठाणे : हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो, तर मराठी बोलायला शिकले पाहिजे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी ठाण्यातील आर. जे. ठाकूर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पाचव्या वार्षिक समारंभामध्ये व्यक्त केले. चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खूप चांगल्याप्रकारे समाजोपयोगी कार्य करीत आहे. त्यांनी हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतोे, असेही ते म्हणाले. या फाउंडेशनतर्फेउत्कृष्ट काम केल्याबदल सुरेश राणाजी, बिरेंद्र नेगी, डॉ. दिनेश चंद आदींना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Web Title: Can be freed from slavery form 200 years, so why not plastic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.