३६ तासांची पाणीकपात रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:05 AM2018-03-30T02:05:55+5:302018-03-30T02:05:55+5:30
मीरा-भार्इंदरची पाणीकपात ३६ तासांवर गेली असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी बुधवारी आयुक्त महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली.
मीरा रोड : मीरा-भार्इंदरची पाणीकपात ३६ तासांवर गेली असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी बुधवारी आयुक्त महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली.
भुयारी मार्गाचे काम पूर्ण करा, उत्तनवासीयांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्याही त्यांनी केल्या. यावेळी पक्षातर्फे ११ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मीरा-भार्इंदर महापालिकेत आयुक्तांच्या दालनात माजी खासदार नाईक यांनी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, पौर्णिमा काटकर, नरेंद्र भाटिया, संतोष गोळे, साजिद पटेल, शिल्पा सावंत, रमेश गायकवाड, भिलारे, साळुंके आदी पदाधिकारी - कार्यकर्त्यांसमवेत आयुक्तांशी चर्चा केली.
मीरा-भार्इंदरची पाणी कपात ३६ तासांवर गेली आहे. या आधी आम्ही प्रत्येकवेळी मीरा-भार्इंदरला पाणी कपातीतून वगळत नागरिकांना दिलासा दिला होता. त्यामुळे आताही पाणीकपात रद्द करा, असे नाईक म्हणाले.
भूमीगत गटार योजनेच्या कामाचा खर्च ५०० कोटींवर गेला आहे, तरीही काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करा. उत्तन व परिसरातील रहिवाशी डम्पिंगमुळे त्रस्त असून त्यांना दिलासा द्या. शहरात फेरीवाले व अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्यावर नियंत्रण न ठेवणारया अधिकाºयांवर कारवाई करा. टीडीआर घोटाळे, विकास आराखडा, पालिकेकडून केली जाणारी अनावश्यक व निकृष्ट दर्जाची बांधकामे, रखडलेले रस्ते, परिवहन सेवेची दुरवस्था आदी अनेक मुद्द्यांवर नाईक यांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गेली दोन वर्षे सतत शहरात येत असून विविध भूमीपुजने, उद्घाटने करीत आहेत. या कार्यक्रमांसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च कुठून केला? असा सवाल करत या खर्चाची चौकशी करुन कारवाई करा, असे निवेदनात म्हटले आहे.
काशिमीरा नाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करणे किंवा उड्डाण पुलापेक्षा उंच नवा पुतळा बसवण्यावर समिती विचार करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणी कपात रद्द करण्यासोबतच अन्य मागण्यांवरही विचार करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.