भाजपाचे स्वीकृत उमेदवार अजित पाटील यांचा अर्ज रद्द करा; आयुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 05:25 PM2020-10-27T17:25:53+5:302020-10-27T17:26:01+5:30

एका भाजपा उमेदवाराची माघार तर सेनेच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्याची भाजपाची मागणी

Cancel the application of BJP's approved candidate Ajit Patil; Complaint to the Commissioner | भाजपाचे स्वीकृत उमेदवार अजित पाटील यांचा अर्ज रद्द करा; आयुक्तांकडे तक्रार

भाजपाचे स्वीकृत उमेदवार अजित पाटील यांचा अर्ज रद्द करा; आयुक्तांकडे तक्रार

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपा मध्ये महापालिकेचे स्वीकृत सदस्यत्व मिळवण्या साठी रस्सीखेच सुरु असून एका उमेदवाराने परस्पर उमेदवारी मागे घेतला असताना दुसरीकडे भाजपचे आणखी एक उमेदवार व निवृत्त पालिका अधिकारी अजित पाटील पात्र नसल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्याची तक्रार एका माजी नगरसेवकाने केली आहे . तर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर ठेका घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती . 

मीरा भाईंदर महापालिकेत ५ जणांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करता येते . पक्षाच्या तौलानिक संख्या बळा नुसार भाजपाचे ३ तर शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी १ स्वीकृत सदस्य होणार आहे . परंतु ऑगस्ट २०१७ मध्ये पालिका निवडणुक झाल्या नंतर तब्बल अडीच वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२० मध्ये स्वीकृत सदस्य नियुक्ती साठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आली . 

त्या मध्ये भाजपा कडून ४ जणांचे अर्ज दाखल केले गेले होते . त्यात माजी नगरसेवक व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले , राष्ट्रवादीतून भाजपात आलेले माजी नगरसेवक भगवती शर्मा , भाजपाचे पदाधिकारी सोहनराज राजपुरोहित व निवृत्त पालिका अधिकारी अजित पाटील अश्या चौघांनी अर्ज दिल्याने भाजपात चढाओढ असल्याचे समोर आले . तर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख विक्रमप्रताप सिंह व काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक शफिक खान यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचा मार्ग मोकळा होता . 

कोरोनाचा संसर्ग आणि भाजपातील रस्सीखेच या मुळे स्वीकृत सदस्यच्या नियुक्त्या रखडल्या .  त्यातच भगवती शर्मा हे माजी आमदार नरेंद्र मेहतांचे समर्थक असले तरी ते नुकतेच राष्ट्रवादीतून आले असल्याने भाजपा कडून भोसले , पाटील व राजपुरोहित या तिघांची नावे निश्चित मानली जात होती . 

परंतु स्वीकृत पदासाठीच्या रस्सीखेच मध्ये राजपुरोहित यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन ते राजस्थानला गावी निघून गेले . खुद्द जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रेंना देखील राजपुरोहित यांनी कल्पना न दिल्याने सदरची खेळी भगवती साठी मेहता समर्थकांनी केल्याची चर्चा रंगली  आहे . परंतु राजपुरोहित यांनी माघार घेतल्याने उर्वरित तिघांचा स्वीकृत सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला . 

तसे असले तरी सदस्य नियुक्ती बाबत आयुका डॉ . विजय राठोड यांनी बोलावलेल्या दोन बैठकीत भाजपाचे उपमहापौर ताठ गटनेते हसमुख गेहलोत व सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी शिवसेना उमेदवार विक्रमप्रताप सिंह यांच्या बाबत हरकत घेतली . विक्रम यांनी कोरोना संसर्ग काळात जेवण पुरवण्याचे कंत्राट घेतलेले ते ठेकेदार असल्याने उमेदवारी रद्द करा अशी मागणी केली . 

विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील यांनी भाजपच्या हरकतील आक्षेप घेत सदर प्रक्रिया निवडणुकी प्रमाणे असून छाननी झालेली असल्याने त्या नंतर आलेल्या हरकती ग्राह्य धरता येणार नाही असा मुद्दा मांडला . शिवाय अन्य उमेदवारा बद्दल सुद्धा आक्षेप असल्याचे ते म्हणाले . आयुक्तांनी छाननी प्रक्रिया झालेली असल्याचे सांगितल्याने भाजपा कडून या प्रकरणी महासभेत मुद्दा  उपस्थित करण्याचा इशारा देण्यात आला . 

आता माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी आयुक्त डॉ . विजय राठोड यांना लेखी तक्रार करून भाजपचे अजित पाटील यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे . स्वीकृत पदासाठी महापालिकेचा सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम करण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे . 

परंतु पाटील हे शैक्षणिक पात्रते नुसार त्या पदावर कार्यरत नव्हते .  करनिर्धारक व संकलक या पदावर त्यांना पदवी उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पदोन्नती देण्यात आली होती . ते देखील ३ वर्षच सदर पदावर होते . ३१ जुलै २००९ रोजी ते निवृत्त झाले . त्यामुळे त्यांचा रद्द करण्याची मागणी सुवर्णाचे यांनी केली आहे . 

Web Title: Cancel the application of BJP's approved candidate Ajit Patil; Complaint to the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.