‘शाम ए पाकिस्तान’ रद्द करा !

By Admin | Published: August 30, 2015 11:31 PM2015-08-30T23:31:43+5:302015-08-30T23:31:43+5:30

दिल्ली येथे ‘एक शाम पाकिस्तान के नाम’ व कव्वाली कार्यक्रम ‘शाम ए पाकिस्तान’ हे प्रदर्शन अनुक्रमे १० व ११,१२ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. पण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी

Cancel 'Evening A Pakistan'! | ‘शाम ए पाकिस्तान’ रद्द करा !

‘शाम ए पाकिस्तान’ रद्द करा !

googlenewsNext

ठाणे : दिल्ली येथे ‘एक शाम पाकिस्तान के नाम’ व कव्वाली कार्यक्रम ‘शाम ए पाकिस्तान’ हे प्रदर्शन अनुक्रमे १० व ११,१२ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. पण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने हे कार्यक्रम घेवू नये यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन अंतर्गत हिंदू जनजागृती समितीसह अन्यही हिंदू संघटनानी एकत्र येऊन ठाणे रेल्व स्टेशन बाहेर सायंकाळी निदर्शने करून प्रखर विरोध दर्शविला आहे.
दाऊदसारख्या आतंकवाद्याला आश्रय देऊन आतंकवाद्याना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांचा कव्वालीचा कार्यक्रम व पाकिस्तानी कारागिरांच्या कलाकुसरीचे प्रदर्शन केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने घेऊ नये, ते रद्द करण्याचे फर्मान काढावे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलावी आदी मागण्यांसाठी हिंदू संघटनानी ठाण्यात सायंकाळी तीव्र आंदोलन केले. यामध्ये हिंदू जनजागृती समितीसह शिव प्रतिष्ठान, स्वाभिमान प्रतिष्ठाण, बजरंग दल, हिंदू महासभा, शिवसेना आणि सनातन प्रभात आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याचे हिंदू जनजागृती समितीचे प्रसन्न ढगे यांनी सांगितले. या वेळी जोरदार नारेबाजीही करण्यात आली.
(प्रतिनिधी)

Web Title: Cancel 'Evening A Pakistan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.