कोरोनामुळे परिक्षा रद्द करा, भारती परिषदेचे बेमुदत उपोषण सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 05:05 PM2020-07-16T17:05:32+5:302020-07-16T17:20:28+5:30

परिक्षा घेण्याचा निर्णय रद्द करुन जोर्पयत विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाण्याचे आदेश काढले जात नाही

Cancel the exam due to corona, start indefinite fast of Bharati Parishad | कोरोनामुळे परिक्षा रद्द करा, भारती परिषदेचे बेमुदत उपोषण सुरु

कोरोनामुळे परिक्षा रद्द करा, भारती परिषदेचे बेमुदत उपोषण सुरु

Next
ठळक मुद्देपरिक्षा घेण्याचा निर्णय रद्द करुन जोर्पयत विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाण्याचे आदेश काढले जात नाही

कल्याण- कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची पार्श्वभूमी पाहता परिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी भारती परिषदेच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कल्याण बापगाव येथील मैत्रकूल सामाजिक संस्थेच्या आवारात आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. परिक्षा रद्द करण्याच्या मागणासाठी केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा करुन देखील दखल घेतली जात नसल्याने हे उपोषण सुरु करण्यात आले आहे.

परिक्षा घेण्याचा निर्णय रद्द करुन जोर्पयत विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाण्याचे आदेश काढले जात नाही. तोर्पयत उपोषण मागे घेतला जाणार नाही असा निर्धार उपोषणकर्त्या धुरी यांनी व्यक्त केला. कोरोना काळात विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या असून परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकार , केंद्र सरकार आणि विद्यार्थी संघटना, राष्ट्पती यांच्याकडून वेगवेगळया मागण्या करण्यात आल्या आहे. परीक्षेबाबत स्पष्ट अंतिम निर्णय घेतला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. परिक्षा रद्द करण्याचा निर्णय येत्या सात दिवसात घेण्याचा अल्टीमेट केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाला विद्यार्थी भारती परिषदेने दिला होता. त्यानंतरही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.


 

Web Title: Cancel the exam due to corona, start indefinite fast of Bharati Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.