नगरसेवकांचे आलिशान दौरे रद्द करा, मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:32 AM2018-04-06T06:32:44+5:302018-04-06T06:32:44+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे.
मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली लाखो रु पयांच्या निधीचा दुरु पयोग होत असल्याने जबाबदार नगरसेवक व निधी मंजूर करणा-या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगरसेवकांचे नैनिताल, दार्जिलिंग, कूर्ग अशा पर्यटन ठिकाणी तब्ब्ल तीन दौरे मंजूर करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर नगरसेवकांच्या उधळपट्टीवर विविध स्तरांतून टीकेची झोड सुरू झाली आहे. काँग्रेस नगरसेवकांनी दौºयावर न जाण्याचा निर्णय जाहीर करत भाजपा व शिवसेना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
दुसरीकडे मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह नरेंद्र पाटोळे, शशी मेंडन, हेमंत सावंत, दिनेश कनावजे, प्रमोद देठे, सुशील कदम, गिरीश सोनी, सचिन पोपळे, मंगेश कांबळी, जितू शेणॉय, शेखर गजरे, नरेंद्र नाईक,अरविंद जैन, नितीन पाटील, मनीष कामटेकर, गणेश काकडे, नितीन अंडगळे, हरेश सुतार, त्रिलोक मोंगरे, रॉबर्ट डिसोझा, अभिनंदन चव्हाण, सूर्या पवार, स्वप्नील गुरव, रोशन पुजारी, प्रज्वल वेदपाठक, सुशांत तटकरे आदींच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निधी नाही म्हणून विकासकामे रखडल्याचे सांगून नागरिकांवर घनकचरा शुल्क, पाणीपट्टी व मालमत्ता दरवाढ असा बोजा टाकून त्यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. करवाढीसह निधीअभावी पालिका
रु ग्णालयात वैद्यकीय सुविधा व औषधे नाहीत, मच्छरांवरील औषधफवारणी बंद करत १८०
कंत्राटी कामगार घरी बसवले. परिवहनव्यवस्था कोलमडली आहे, तर पालिका शाळांची दुरवस्था आहे. शहरातील नागरिक विविध समस्यांनी त्रासले असताना नगरसेवकांच्या अभ्यास दौºयाच्या नावावर केवळ आलिशान सहली झडत असल्याबद्दल नागरिक संतप्त असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या दौºयांचा शहराला कुठलाही फायदा झालेला नसून उलट नगरसेवकांच्या दौºयातील मौजमजा व भांडणाच्या चर्चा रंगल्या आहेत.
ठिय्या आंदोलनाचा इशारा
अभ्यास दौºयात केवळ एक दिवसच तेथील पालिकेला भेट देण्याचे नाटक करून उर्वरित दिवस मात्र पर्यटनस्थळी मजा करण्यात घालवले जात असल्याने हा निधीचा दुरु पयोग आहे.
त्यामुळे तो थांबवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे स्पष्ट करत मनसेने गेल्या एक वर्षापासूनच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.