उमेदवारांवर परदेशातील मालमत्ता, खात्यांचा तपशील देण्याचे बंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:37 AM2019-09-29T00:37:18+5:302019-09-29T00:38:12+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याचा कार्यक्र म राज्यभर सुरू झाला आहे.
भिवंडी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याचा कार्यक्र म राज्यभर सुरू झाला आहे. यावेळी ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून तशा सूचनाही राज्यातील सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले आहेत.
विधानसभा निवडणूक लढवणाºया उमेदवाराला संपत्ती आणि मालमत्तेची तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहितीही नामनिर्देशन शपथपत्रात देणे अनिवार्य असून या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराची परदेशातील मालमत्ता व बँक खात्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत शपथपत्रात आपल्या परदेशातील मालमत्ता आणि बँक खात्यांचा तपशीलही दाखल करावा, अशी सूचना भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली. तसेच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जातील नमुना २६ मध्ये उमेदवारांनी शपथपत्राच्या प्रत्येक पानावर अभिसाक्षीची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त शपथपत्राच्या प्रत्येक पानावर नोटरी किंवा शपथ आयुक्त किंवा दंडाधिकारी यांच्या समक्ष शपथपत्र सत्यापन केले असेल त्याचा शिक्का असणे आवश्यक आहे. मालमत्ता व बँक खात्यांची माहिती देणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रात एकही रकाना रिकामा राहणार नाही, याची काळजी प्रत्येक उमेदवाराने घेणे गरजेचे आह, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिल्या आहेत.