‘उम्मीद’मुळे मिळाली जगण्याची उमेद, कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांनी केले अनुभवकथन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:26 AM2019-02-06T03:26:53+5:302019-02-06T03:27:14+5:30

असाध्य आजारांवर मात करणाऱ्या प्रत्येकाला ‘उम्मीद’ या कार्यक्रमामुळे जगण्याची उमेद मिळाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उम्मीद हे नाव समर्पक आहे

 Candidates' hope of getting 'hope', the success of cancer patients, | ‘उम्मीद’मुळे मिळाली जगण्याची उमेद, कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांनी केले अनुभवकथन

‘उम्मीद’मुळे मिळाली जगण्याची उमेद, कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांनी केले अनुभवकथन

Next

डोंबिवली - असाध्य आजारांवर मात करणाऱ्या प्रत्येकाला ‘उम्मीद’ या कार्यक्रमामुळे जगण्याची उमेद मिळाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उम्मीद हे नाव समर्पक आहे, असे मत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
जागतिक कॅन्सर दिनानिमित्त शहरातील एका रुग्णालयातर्फे ‘उम्मीद’ हा कार्यक्रम सोमवारी डोंबिवली जिमखान्यात पार पडला. या वेळी कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांनी आपले अनुभव कथन केले. या आजारातून बाहेर पडण्यास बळ आणि धीर दिल्याबद्दल रुग्णांनी डॉक्टर आणि रुग्णालयांतील अन्य कर्मचाºयांचे आभार मानले.
यावेळी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,
रु ग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर, संचालिका संपदा शिरोडकर, माजी नगरसेवक राजन मराठे, नंदू जोशी, मेट्रन राजगोपाल उपस्थित होत्या.
डॉ. शिंदे म्हणाले, ‘माणसांकडे किती ही संपत्ती असली तरी त्याचे आरोग्य चांगले नसेल तर संपत्तीचा काहीच उपयोग नाही. कॅन्सरशी लढा देणाºया ९० टक्के रुग्णांना मोफत केमोथेरपी या रुग्णालयातर्फे दिली जाते, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.’
डॉ. सागर गायकवाड या वेळी म्हणाले, रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी अतोनात प्रयत्न करण्याची गरज आहे, तरच त्यांना यश मिळेल. कॅन्सर हा शत्रू स्ट्राँग आहे. म्हणून त्याच्याशी स्ट्राँगपणे प्रतिकार केला पाहिजे. डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी, रुग्णालयातील सामग्री उपलब्ध करून दिल्यामुळेच आपण यशस्वीपणे उपचार करू शकलो, असे ते म्हणाले.
दरम्यान, कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रोटीन्स बॉल, प्रवासी सवलत कार्ड यासह अनेक प्रकारचे उपयोगी साहित्य भेट यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

डॉक्टरांचा केला सत्कार

क ॅन्सरवर उपचार करणाºया डॉ. अमित चक्रवर्ती, मेडिकल अर्थीलॉजिस्ट राकेश पाटील, डॉ. सागर गायकवाड, बे्रस्ट कॅन्सर सर्जन यश लोने, डॉ. प्रशांत खडसे,
भारत शिंदे, राहुल जानकर, बॉबी सदावर्ती, आशीष चौरसिया, सचिन गुप्ता, पराग तेलवणे, विशाल सकपाळ, जिग्नेश शहा, शिल्पा आगवणी, कनन घरत, सुरेश सोनी या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Candidates' hope of getting 'hope', the success of cancer patients,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.