ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्यास अटक: ५७ हजारांचा गांजा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:54 PM2020-10-06T23:54:35+5:302020-10-06T23:57:38+5:30

ठाण्यात गांजाची तस्करी करणा-या दीपक दत्ता मोहिते (५२, रा. पनवेल, जि. रायगड) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. त्याला ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Cannabis smuggler arrested in Thane: 57,000 cannabis seized | ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्यास अटक: ५७ हजारांचा गांजा हस्तगत

राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात गांजाची तस्करी करणा-या दीपक दत्ता मोहिते (५२, रा. पनवेल, जि. रायगड) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. त्याच्याकडून ५७ हजारांचा चार किलो ९२० ग्रॅम गांजा आणि रोकड असा ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीपक हा त्याच्या अन्य एका साथीदारासह उथळसर येथील एमटीएनएल कार्यालयासमोर गांजाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ आॅक्टोबर रोजी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि हवालदार रवींद्र काटकर यांच्या पथकाने सापळा रचून दीपकला महानगर टेलिफोन निगमच्या उथळसर येथील कार्यालयासमोर ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये ५७ हजारांचा गांजा, रोकड आणि इतर साहित्य असा ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम ८-क, २०-ब, २९ नुसार राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपकला ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Cannabis smuggler arrested in Thane: 57,000 cannabis seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.