योलोसह कॅप फाऊंडेशनचे प्राण्यांसाठी मातीच्या भांड्यांचे वितरण; जॅकलिन फर्नांडीसचाही सहभाग

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 31, 2024 04:54 PM2024-05-31T16:54:42+5:302024-05-31T16:57:05+5:30

जॅकलिन फर्नांडिसच्या योलो (यू ओन्ली लिव्ह वन्स) फाऊंडेशन आणि ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन (कॅप) ने मुंबई आणि उपनगरात एक हजार पाण्यासाठी मातीचे भांडे वितरित करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली.

cap and yolo foundation distribution of pottery for animals in thane actress jacqueline fernandez involve in this campaign | योलोसह कॅप फाऊंडेशनचे प्राण्यांसाठी मातीच्या भांड्यांचे वितरण; जॅकलिन फर्नांडीसचाही सहभाग

योलोसह कॅप फाऊंडेशनचे प्राण्यांसाठी मातीच्या भांड्यांचे वितरण; जॅकलिन फर्नांडीसचाही सहभाग

प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : एप्रिल आणि मे महिन्यांतील वाढत्या उन्हाळ्यातील तापमान आणि रस्त्यावरील प्राण्यांवर त्यांचे होणारे हानिकारक परिणाम यांना दयाळू प्रतिसाद म्हणून, जॅकलिन फर्नांडिसच्या योलो (यू ओन्ली लिव्ह वन्स) फाऊंडेशन आणि ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन (कॅप) ने मुंबई आणि उपनगरात एक हजार पाण्यासाठी मातीचे भांडे वितरित करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली. ही मोहीम आता शेवटच्या टप्प्यावर आहे आणि ती पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण यामुळे निर्जलीकरण आणि उष्णतेच्या तणावाने त्रस्त असलेल्या रस्त्यावरील प्राण्यांना अत्यंत आवश्यक आराम मिळाला आहे. शहरी वातावरणात पुरेसा हायड्रेशन शोधण्यासाठी अनेकदा संघर्ष करणाऱ्या प्राण्यांसाठी सुलभ जलस्रोतांची तातडीची गरज या उपक्रमाने अधोरेखित केली असल्याचे कॅपने सांगितले. 

प्रसिद्ध अभिनेत्री आणि योलो फाऊंडेशनच्या संस्थापक जॅकलीन फर्नांडिस हिने या सामाजिक उपक्रमाप्रती तिची बांधीलकी असल्याचे व्यक्त केले. "कडक उन्हाळ्यात रस्त्यावरील प्राण्यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यांचे आरोग्य सुनिश्चित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण शहरात पाण्याचे मातीचे भांडे वितरित करून, आपण प्राण्याच्या जीवनात लक्षणीय बदल घडवून आणू शकतो आणि या उपक्रमात सहभागी व्हावे आणि या असुरक्षित प्राण्यांना मदत करावी असे आपल्या आवाहनात जॅकलीनने म्हटले आहे. 

कॅपचे व्यवस्थापकीय संचालक सुशांक तोमर म्हणाले की, "योलो फाऊंडेशन सोबतच्या आमच्या सहकार्यामुळे रस्त्यावरील प्राण्यांचे रक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना मिळाली. ही मोहीम केवळ पाण्याची तातडीची गरजच नाही तर प्राणी कल्याणाच्या व्यापक मुद्द्याबद्दल जागरूकता वाढवते. ज्या भागात दूरपर्यंत पाण्याची सोय नाही आणि रस्त्यांवरील प्राण्यांचा वावर आहे अशा ठिकाणी मातीचे भांडे ठेवण्यात आले आणि सोसायट्यांनाही त्याचे वाटप करण्यात आले. स्वयंसेवकांनी हे सुनिश्चित केले की वाट्या नियमितपणे पुन्हा भरल्या जातात आणि सतत पाणी पुरवठा करण्यासाठी त्यांची देखभाल केली जाते. हा सहयोगी प्रयत्न म्हणजे मुंबई, ठाणे यांसारख्या शहरातील नागरिकांनी एकत्र येण्यासाठी आणि रस्त्यावर राहणाऱ्या प्राण्यांबद्दल सहानुभूती दाखवण्याचे आवाहन आहे. दयाळूपणाची प्रत्येक छोटी कृती सर्व सजीवांसाठी अधिक मानवी आणि काळजी घेणारे वातावरण तयार करण्यात योगदान देऊ शकते असे सुशांकने सांगितले.

Web Title: cap and yolo foundation distribution of pottery for animals in thane actress jacqueline fernandez involve in this campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.