कोवीड केअर सेंटरची क्षमता वाढविली जाणार आयसीयुचे आता 150 बेड होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 06:41 PM2020-09-04T18:41:29+5:302020-09-04T18:41:32+5:30
आणखी 350 च्या आसपास बेड वाढविले जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली.
ठाणे : पुण्यात ऑक्सीजन, बेड उपलब्ध नसणो आणि अॅम्ब्युलेन्स वेळेवर न मिळाल्यामुळे एका पत्रकाराचा मृत्यु झाला होता. त्यानंतर आता इतर ठिकाणच्या पालिकेच्या कोवीड रुग्णांलयाबाबत आक्षेप घेतले जात होते. असे असतांनाच आता ठाण्यातील कोवीड केअर सेंटरच्या बेडची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला आहे. त्यातही सध्या आयसीयुचे येथे 76 बेड असतांना त्यात आणखी वाढ होणार असून त्याची क्षमता आता 150 एवढी होणार आहे.
याशिवाय येथे एकूण आणखी 350 च्या आसपास बेड वाढविले जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली. ठाणो महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे 1004 खाटांचे कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी सध्या 343 बेड फुल असून उर्वरीत 661 बेड शिल्लक आहेत. यामध्ये आयसीयुचे सात बेड शिल्लक असून 657 बेड हे जनरल वॉर्डचे शिल्लक आहेत. परंतु आता सप्टेंबरमध्ये पुन्हा ठाण्यात कोवीड बाधीत रुग्णांची संख्या मागील काही दिवसात वाढतांना दिसत आहे. त्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयांपोठापाठ कोवीड सेंटर मधील बेडही आता भरु लागले आहेत. परंतु सध्या रुग्णांना पुरतील एवढे बेड प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु ागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांना आयसीयु बेडची कमतरता भासू नये यादृष्टीकोणातून आता पालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
सध्या कोवीड केअर सेंटरमध्ये आयसीयुचे 76 बेड असून त्यातील सध्याच्या घडीला केवळ 7 बेडच शिल्लक आहेत. परंतु नव्याने वाढणा:या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन रुग्णांना आयसीयु बेड मिळाला नाही, म्हणून तक्रार येऊ नये, किंवा एखाद्या रुग्णाचा मृत्यु ओढावून नये या दृष्टीकोणातून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी येथील बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी केलेल्या पाहणीत त्यांनी संबधींत विभागाला येथील बेड वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने तत्काळ पावले उचलण्यात यावीत असेही त्यांनी सांगितले आहे.