भाईंदर मध्ये पुठ्ठा कंपनीला आग; ५० मिनिटांनी आग आटोक्यात आणली

By धीरज परब | Published: July 15, 2023 05:25 PM2023-07-15T17:25:39+5:302023-07-15T17:26:02+5:30

भाईंदर पश्चिमेच्या सेकंडरी शाळे मागील  तोदि उद्योग नगर मधील पुठ्ठा कंपनीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली . 

Cardboard company fire in Bhayander; | भाईंदर मध्ये पुठ्ठा कंपनीला आग; ५० मिनिटांनी आग आटोक्यात आणली

भाईंदर मध्ये पुठ्ठा कंपनीला आग; ५० मिनिटांनी आग आटोक्यात आणली

googlenewsNext

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या सेकंडरी शाळे मागील  तोदि उद्योग नगर मधील पुठ्ठा कंपनीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली . 

दलपत चौधरी यांनी शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास पुठ्ठा कंपनीला आग लागल्याचे अग्निशमन दलास कळवल्या नंतर  दोन अधिकारी व सुमारे १५ जवान , ५ आगशामक यंत्र घटनास्थळी दाखल झाले . कंपनीतील पुठ्ठा  आदी ज्वलनशील साहित्याने पेट घेतल्याने आग चांगलीच भडकली होती .

५० मिनिटांनी आग आटोक्यात आणली . आगीत सुमारे ७० हजारांचे नुकसान झाले असल्याची नोंद अग्निशमन दलाने केली आहे . आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी गाळ्यात अग्निशामक यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे . 

Web Title: Cardboard company fire in Bhayander;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.