मोबाइलवर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:49 AM2018-02-22T00:49:47+5:302018-02-22T00:49:49+5:30

आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजिटल युगासाठी महत्वाचे असून व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे.

Careful care should be taken while downloading apps on mobile | मोबाइलवर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी

मोबाइलवर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी

Next

ठाणे : आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजिटल युगासाठी महत्वाचे असून व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे. मोबाइलवर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी, गरजेचे व अधिकृतच अ‍ॅपच डाऊनलोड करावेत, असा सल्ला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आल्हाद आपटे यांनी दिला.
जिज्ञासा ट्रस्ट ठाणे व लोकजागर, ठाणे आयोजित सी.डी. देशमुख - दिलीप महाजन स्मृती व्याख्यान अंतर्गत ‘डिजिटल जग व सायबर सुरक्षा’ या याविषयावर ते मंगळवारी मराठी ग्रंथ संग्रहालयात बोलत होते. ते म्हणाले की, ज्या मोबाइलवरुन पैशांचे व्यवहार केले जातात त्या मोबाइलवर गेम्स किंवा इतर अ‍ॅप्स डाऊनलोड करू नयेत. आपला मोबाइल हा डिजीटल युगाचा भाग आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सायबर अ‍ॅटॅक हे कमी सुरक्षित असलेल्या संगणकाला हॅक करून सिस्टीमचा ताबा घेतात. त्यामुळे आपला संगणक सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी परवाना असलेले सॉफ्टवेअर वापरा, पायरेटेड सॉफ्टवेअर वापरू नका. पायरेटेड सॉफ्टवेअर स्वस्त असतात म्हणून आपण त्याला भुलतो. परंतु, वायरसचेही अंडरवर्ल्ड असते. त्यामुळे दोन तीन दिवसांत खुप पैसा कमविला जातो. त्यामुळे सॉफ्टवेअर सातत्याने अपडेट केले पाहिजे. सायबर सुक्षेच्या गाभ्यात माहिती असते. त्यात माहितीची गोपीनीयता असावी, ज्याला माहिती मिळविण्याचा अधिकार आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ती माहिती मिळवू नये. त्यात सतत्या असावी म्हणजे मिळविलेली माहिती पूर्ण व अचूक आहे याची खात्री देणारी असावी, अधिकृतरित्या ज्या स्थळी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे तिथे मिळावे. या सायबर सुरक्षेच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. या सुरक्षेसाठी प्रणाली बनवावी लागते. परंतु, ही प्रणाली गरजेपेक्षा कमी बनविली तर धोका वाढेल. कोणतीही सुरक्षा प्रणाली बनविताना धोका पडताळणे गरजेचे आहे. एवढं करूनही काही घडले तर त्याचे होणारे परिणाम कमीत कमी कसे करता येईल, परिणाम झाले तर त्याचे दुष्परिणाम कमी करावे आणि एवढे करुनही सिस्टीम बंद पडली तर ती कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात पुर्व पदावर कशी आणता येईल या तीन पातळ््यांवर सायबर सिस्टीम ही यंत्रणा बनविली जाते असे ते म्हणाले.

Web Title: Careful care should be taken while downloading apps on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.