अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रखवालदारास अटक
By धीरज परब | Published: February 9, 2024 08:32 PM2024-02-09T20:32:08+5:302024-02-09T20:33:16+5:30
मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गृहनिर्माण संकुलातील रखवालदाराने ९ वर्षीय मुलीला बळजबरीने स्वच्छतागृहा कडे नेत विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी रखवालदारास अटक केली आहे .
मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गृहनिर्माण संकुलातील रखवालदाराने ९ वर्षीय मुलीला बळजबरीने स्वच्छतागृहा कडे नेत विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी रखवालदारास अटक केली आहे .
सदर गृहसंकुलात रखवालदार असलेला आरोपी ४४ वर्षांचा असून मूळचा बिहारचा आहे. ८ फेब्रुवारीच्या रात्री पीडित अल्पवयीन ९ वर्षीय मुलगी इमारतीच्या आवारात खेळत होती . त्यावेळी रखवालदाराने इमारतीच्या गेट जवळ तिचा हात धरून तिला स्वच्छतागृहा कडे ओढून नेले . तेथे तिचा विनयभंग केला .
या घटनेची माहिती पोलिसांना तिच्या आईने दिल्यावर तिच्या फिर्यादी वरून गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी विनयभंग सह पोक्सोचा गुन्हा दाखल करत रखवालदारास अटक केली . शुक्रवारी आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला जेल कोठडी मिळाली आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे पुढील तपास करत आहेत .