कसारा घाटातील निकृष्ट संरक्षक कठड्यांमुळे वाहतूकदार, प्रवासी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 03:28 PM2021-06-03T15:28:25+5:302021-06-03T15:30:18+5:30

Kasara ghat: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील नागमोडी वळणावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो कसारा घाटातील संरक्षण कथडे हे पूर्णतःजीर्ण झालेले आहे

Carriers, passengers unsafe due to poor protective walls in Kasara Ghat | कसारा घाटातील निकृष्ट संरक्षक कठड्यांमुळे वाहतूकदार, प्रवासी असुरक्षित

कसारा घाटातील निकृष्ट संरक्षक कठड्यांमुळे वाहतूकदार, प्रवासी असुरक्षित

googlenewsNext

-  शाम धुमाळ 
कसारा - मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील नागमोडी वळणावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो कसारा घाटातील संरक्षण कथडे हे पूर्णतःजीर्ण झालेले आहे हे कठडे मजबुती करणाचे काम पिक इन्फ्रा, व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने इगतपुरी येथील  एका आश्रफभाई  नावाच्या ठेकेदाराला दिले आहे परंतु संबंधित ठेकेदारा कडून या कथड्या च्या दुरुस्ती बाबत संवेदनशील ता बाळगली जात नाही.

अल्पवयीन मुलांच्या मार्फेत हा ठेकेदार व पिक इन्फ्रा कंपनी घाटातील कठडे बांधकाम करून घेत असुन सिमेंट ऐवजी ग्रीट पावडर चा वापर करीत हे कथडे बांधण्याचे, दुरुस्तीचे काम करीत आहेत या संरक्षक कठडे बांधकामात कठडे मजबुती साठी स्टील (लोखडी सळई ) चा वापर करणे गरजेचे असतांना कंपनी व कंपनी ठेकेदार निकृष्ट बांधकाम करीत वाहनचालकांच्या जीवाशी खेळत आहेत वर्षभरात संरक्षक कथडे तोडून दरीत कोसळून 8 ते 10 वाहनांचा आपघात झाला आहे त्यात काहीजण मयत झालें तर काहींना अपंगत्व आले आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आश्रफ नावाच्या  ठेकेदारावर व ठेकेदार कंपनी वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकाकडून होत आहे.
 


.....दर दोन महिन्यांनी कथडे दुरुस्ती चा ठेका 
दरम्यान मुंबई नाशिक महामार्ग वरील संरक्षक कठडे निकृष्ट दर्जाचे बनवले जात असल्याने साधी दुचाकी जरी आधळली तरी कथडे तुटतात त्या मुळे दर दोन महिन्यांनी या कठड्याची बोगस दुरुस्ती करून टोल च्या माद्यमातून सर्वसामान्या वाहतूकदरांच्या खिशाला कात्री देण्याचे काम पिक इन्फ्रा  ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरण करीत आहे.

 nhai  ची बेगडी कारवाई 
दरम्यान मुंबई नाशिक महामार्गा वरील दोन्ही मार्गिकेवरील कसारा घाटातील आपघातचा ठपका ठेवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  ने निकृष्ट बांधकाम,प्रकरणी पिक इन्फ्रा या ठेकेदार कंपनी वर मागील वर्षी दंडात्मक कारवाई केली होती न्हाई कडून ठेकेदार कंपनी ला लाखो चा दंड ठोठवला होता परंतु ती कारवाई बेगडी असल्याचे निदर्शनात आल्याने पिक इन्फ्रा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक दारा कडून समजते.

Web Title: Carriers, passengers unsafe due to poor protective walls in Kasara Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे