कार्टुन, छत्री पतंगांचे लहान मुलांना आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:09 AM2019-01-12T03:09:33+5:302019-01-12T03:10:04+5:30

मकरसंक्रांतीसाठी शहरातील दुकाने सजली : पाच रुपयांपासून १२०० रुपयांदरम्यान उपलब्ध

Cartoon, umbrella kites, the charm of young children | कार्टुन, छत्री पतंगांचे लहान मुलांना आकर्षण

कार्टुन, छत्री पतंगांचे लहान मुलांना आकर्षण

Next

जान्हवी मोर्ये

डोंबिवली : मकरसंक्रांतीला पतंगाचे विशेष महत्त्व आहे. या कालावधीत देशभरात विविध ठिकाणी पतंग उडवण्याची स्पर्धाही होते. इंटरनॅशनल काइट फेस्टिव्हलही होतात. मकरसंक्रांत चार दिवसांवर आल्याने डोंबिवलीमध्ये पतंगांनी दुकाने सजली आहेत. पाच रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंतचे पतंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. छत्रीपतंग लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहे.

माशी, कार्टुन, विविध चित्रे असलेल्या विविध आकारांमध्ये हे पतंग उपलब्ध आहेत. छत्रीपतंगाला चायनापतंगही संबोधले जाते. पूर्वी हे पतंग चीनमधून येत होते, मात्र आता ते महाराष्ट्रातच बनत आहेत. लहान मुलांसाठी हे पतंग विशेष आकर्षण ठरत आहेत. सजावटीसाठी वापरले जाणारे वेगवेगळ्या डिझाइनचे लहान पतंगही बाजारात आले आहेत. हे पतंग खासकरून सजावटीसाठी वापरले जातात. शाळांमधूनही मुलांना पतंग आणण्यास सांगितले जाते. त्याद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना पतंगांतील विविधता आणि तो तयार करण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवतात.
पतंग उडवण्यासाठी आवश्यक असलेल्या फिरक्याही विविध आकारांत उपलब्ध आहेत. काही जण पतंग वाण म्हणूनही दिला जातो. चिनी पतंग बाजारात ८० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. छोटे पतंग पाच आणि १० रुपयांना मिळत असून १२०० रुपयांचा पतंगही बाजारात आला आहे.
समुद्रकिनारी हा पतंग उडवला जातो. डोंबिवलीत या पतंगाला फारशी मागणी नसते; मात्र मुंबईत त्याला मोठी मागणी असते, असे विके्रते शिवाजी जाधव यांनी सांगितले.
पतंगाचे व्यापारी जाधव यांच्याकडून होलसेल आणि रिटेल विक्रेते पतंग खरेदी करतात. मकरसंक्रांतीला १० ते २० हजार रुपयांपर्यंतचे पतंग विकले जातात, असे त्यांनी सांगितले.

किमती ‘जैसे थे’
पतंगांच्या मांजाची फिरकी ३० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. नायलॉन मांजावर बंदी असल्याने तो दुकानात ठेवला जात नाही. या फिरकीमध्ये साधा दोरा येतो. कागदी पतंगांबरोबरच आता प्लास्टिकचे पतंगही बाजारात आले आहेत. त्यावर कार्टुनची डिझाइन असते. त्यामुळे लहान मुलांच्या पसंतीला ते उतरत आहेत. यंदा पतंगांच्या किमतीमध्ये कोणतीही भाववाढ नाही, असेही जाधव यांनी सांगितले.
 

Web Title: Cartoon, umbrella kites, the charm of young children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे