कोरोना टेस्टप्रकरणी महापालिकेचे घुमजाव, स्वखर्चाने टेस्ट करणाऱ्यांसाठीच रुपये ३ हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 05:42 PM2020-05-23T17:42:08+5:302020-05-23T17:59:31+5:30
कोरोना रुग्णांच्या तपासणीकरीता सुरुवातीलापासून मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात जावे लागत होते. 1 एप्रिल पासून महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीकरीता मुंबईतील हाफकीन संस्थेत पाठविले जात होते.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मीणीबाई रुग्णालयात क्रेष्णा डायग्नोस्टीक या खाजगी कंपनीसोबत करार करुन कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी एका व्यक्तिला कोरोना टेस्टकरीता 3 हजार रुपये आकारण्यात येत होते. त्याला सर्व स्तरातून विरोध झाल्याने महापालिकेने या शुल्क आकारणीविषयी घुमजाव करीत स्वखर्चाने टेस्ट करु इच्छीणा:यांनाच 3 हजार रुपये आकारले जात असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे शुल्क आकारणी प्रकरणी महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.
कोरोना रुग्णांच्या तपासणीकरीता सुरुवातीलापासून मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात जावे लागत होते. 1 एप्रिल पासून महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीकरीता मुंबईतील हाफकीन संस्थेत पाठविले जात होते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. महापालिकेने आठ ठिकाणी तापाचे दवाखाने सुरु केले. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणो आढळून येतात. त्याना भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्र येथे पाठविले जाते. त्याठिकाणी दाखल केल्यावर ज्यांना स्वखर्चाने कोरोना चाचणी करायची आहे. त्या नागरीकांसाठी खाजगी टेस्ट लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पिवळे व केशरी रंगाच्या रेशनकार्ड धारकांची कोरोना टेस्ट मोफत केली जात आहे. आत्तार्पयत डोंबिवलीतील कोविड शास्त्रीनगर रुग्णालयात व टाटा आमंत्र येथे 1 हजार 495 जणांची कोरोना टेस्ट केली आहे. ही टेस्ट मोफत करण्यात आली आहे. त्याचबरोबर खाजगी लॅबमध्ये जाऊन 1 हजार 654 नागरीकांनी स्वइच्छेने कोरोना टेस्ट केली आहे.
खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करीता 4 हजार 500 रुपये आकारले जातात. रुक्मीणीबाई रुग्णालयात क्रेष्णा डायग्नोस्टीक लॅब ही केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणो 3 हजार रुपये शुल्क आकारत आहे. तरी देखील काही मंडळी महापालिका कोरोना टेस्टकरीता जास्त पैसे आकारत असल्याचा आरोप करुन संभ्रमाचे वातावरण तयार करीत असल्याचा आरोप महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. टेस्ट व उपचार मोफत व्हावे यासाठी मनसे आमदार राजू पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड, रविंद्र चव्हाण व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मागणी केली होती. टेस्टच्या शुल्क आकारणी प्रकरणी महापालिकेने घुमजाव केले असले तरी उपचाराचा खर्च अद्याप आकारला जात आहे. तो देखील जास्त असून तो माफ केला जावा अशी मागमी या लोकप्रतिनिधींनी उचलून धरली आहे.