सदनिका खरेदीदारांना इमारतीच्या जागेचे हस्तांतरण करून न देणाऱ्या बड्या बिल्डरांसह जमीन मालकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 12:08 PM2021-12-16T12:08:46+5:302021-12-16T12:08:54+5:30

मीरारोड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यात इमारतीतील रहिवाश्यानीच फिर्याद दिल्या आहेत

Case filed against land owners including big builders for not transferring building space to flat buyers | सदनिका खरेदीदारांना इमारतीच्या जागेचे हस्तांतरण करून न देणाऱ्या बड्या बिल्डरांसह जमीन मालकांवर गुन्हे दाखल

सदनिका खरेदीदारांना इमारतीच्या जागेचे हस्तांतरण करून न देणाऱ्या बड्या बिल्डरांसह जमीन मालकांवर गुन्हे दाखल

Next

मीरारोड - सदनिका विकून अनेक वर्ष झाली तरी इमारतीची जागा गृहनिर्माण संस्थेच्या नावे न केल्या प्रकरणी मीरा भाईंदर मधील इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी, रवी डेव्हलपर्स व युनिक शांती डेव्हलपर्स सह जमीन मालक आदींवर मोफा कायद्याच्या अंतर्गत मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 

मीरारोड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यात इमारतीतील रहिवाश्यानीच फिर्याद दिल्या आहेत . मीरारोडच्या बेवर्ली पार्क भागात रॉयल क्रिस्ट इमारत हि रॉयल असोसियट्स कंपनीचे मालक एच.व्ही. हरिया यांनी बांधली आहे . विकासकाने सदनिका रहिवाश्याना विकून झाल्यावर २००४ साली इमारतीच्या गुरच निर्माण संस्थेची नोंदणी झालेली आहे . परंतु १७ पेक्षा जास्त वर्ष होऊन देखील विकासकासह रवी डेव्हलपर्स व  व इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी यांनी मोफा कायद्याने बंधनकारक असून देखील इमारतीची जागा गृहनिर्माण संस्थेच्या नावे करून दिलेली नाही . या प्रकरणी सदनिका धारक एन्टोनी फ्रान्सीस कल्लारक्कल यांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी १३ डिसेम्बर रोजी गुन्हा दाखल केला आहे .   

दुसरा गुन्हा हा मीरारोड मधील आणखी एक बड्या बिल्डर युनिक शांती डेव्हलपर्स सह कुंतल मेस्त्री आणि जमीन मालक चंद्रदत्ता नवलकर यांच्यावर दाखल झाला आहे .  मीरारोडच्या शांती पार्क मधील  ओम चैतन्य इमारत बनवून १९९८ साला दरम्यान सदनिकांची विक्री विकासकाने केली होती. २००० साली गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झाली .  मोफा कायद्या नुसार गृह निर्माण संस्था नोंदणी झाल्यावर ४ महिन्यात इमारतीची जागा संस्थेच्या नावाने करून देणे बंधनकारक असताना २१ वर्ष उलटून देखील विकासक , जमीन मालक यांनी जमिनीचे मालकी हक्क दिले नाहीत . संस्थेचे सचिव मोहन अमीन यांच्या फिर्यादी नंतर मीरारोड पोलिसांनी १४ डिसेम्बर रोजी गुन्हा दाखल केला आहे .  

शहरातील विकासक व जमीन मालकांनी नागरिकांना सदनिका - गाळे लाखो व करोडो रुपयांना विकून बक्कळ पैसा कमावला आहे . परंतु इमारतीच्या जमिनी मात्र खरेदीदार नागरिकांच्या गृहनिर्माण संस्थांच्या नावाने करून न देता त्यांची फसवणूक व आर्थिक पिळवणूक चालवली आहे . या आधी देखील शांती स्टार बिल्डर , कनकिया बिल्डर , जांगीड बिल्डर , छेडा आदींवर मोफा कायद्या खाली गुन्हे दाखल झाले आहेत . 

 

Web Title: Case filed against land owners including big builders for not transferring building space to flat buyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.