क्रिकेट मॅचवर सट्टा खेळवणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: May 28, 2023 06:10 PM2023-05-28T18:10:03+5:302023-05-28T18:11:22+5:30
२४ जणांना क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळण्यासाठी खाते उघडून दिल्याचे आढळले .
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागात आयपीएल क्रिकेट मॅच वर सट्टा चालवला जात असल्या प्रकरणी गुन्हे शाखा १ ने कारवाई करून ५ जणांवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
रामदेव पार्क परिसरात आयपीएल क्रिकेट मॅचवर जुगार चालत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ च्या पथकाने डोप्सी चाय च्या दुकानाबाहेर बसून मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या आयपीएल मॅच वर सट्टा चालवणाऱ्या सन्नी बापी दास (२१) याला पकडले . दास हा जुगार चालवणे व खेळण्यासाठी मिळालेले आयडी वापरत होता . सचिन पांडे हा त्याला आयडी ओपन करून पासवर्ड देत होता.
दास याने २४ जणांना क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळण्यासाठी खाते उघडून दिल्याचे आढळले . पोलिसांनी दास याला अटक केली तर सचिन पांडे व इतर तीन जण अश्या एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला . नवघर पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत .