मीरारोडमध्ये  एका तरुणीचा व्हिडीओ काढून धर्मांतर केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: July 18, 2023 12:15 AM2023-07-18T00:15:03+5:302023-07-18T00:15:18+5:30

तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

case has been registered against five people in the case of conversion of a young woman by recording a video in mira road | मीरारोडमध्ये  एका तरुणीचा व्हिडीओ काढून धर्मांतर केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

मीरारोडमध्ये  एका तरुणीचा व्हिडीओ काढून धर्मांतर केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोड मध्ये राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीला आत्महत्या करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला . तिचे नग्न व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली , तिचे बळजबरी धर्मांतर केले व दुबईला पाठवण्यासाठी मारहाण केल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी अमीन शेख ला अटक केली आहे . 

१६ जुलै रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नुसार पीडित २२ वर्षीय तरुणी मीरारोडची राहणारी आहे . तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून न्याय नगर भागात राहणाऱ्या अमीन शी तिची ओळख झाली होती . अमीन याने प्रेम करत असल्याचे सांगितल्यावर तिने नकार दिला. अमीन ने चाकू काढून स्वतः आत्महत्या करणार असे धमकावल्याने तिने प्रेमास होकार दर्शवला .  

अमीन याने तिला घरी नेऊन आई रेश्मा ,वडील आजम व भावाची मुलगी आईझा यांच्याशी ओळख करून दिली . आईझा आजारी असल्याचे सांगून तरुणीला घरी नेले व पुन्हा आत्महत्या करण्याची धमकी देऊन तिच्या सोंबत शारीरिक संबंध केले . तिचे नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला घरच्यांना , आपण अमीन सोबत लग्न केल्याचा संदेश पाठवायला लावला . 

मीरारोडच्या लॉज मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करत दुसऱ्या दिवशी २१ जून २०२२ रोजी तिला त्याने त्याच्या दोन मित्रांसह गाडीतून वांद्रे येथे काझी कडे नेले . तिच्या कडून १०० रुपयांच्या ३ स्टॅम्प पेपर सह्या घेत तू आता मुस्लिम झाली असून तुझे नाव राहिमा असल्याचे सांगण्यात आले . त्या रात्री अमीन यांनी तिला पुन्हा मीरारोडच्या लॉज वर  नेले . भाईंदरच्या चौक येथील बालेपिर शाह दर्गा येथे तिला दुसऱ्या दिवशी नेण्यात आले .  

अमीन सोबत ती त्याच्या घरी राहू लागल्यावर आईझा हि भावाची मुलगी नव्हे तर अमिनच्या पहिल्या पत्नीची व त्याची मुलगी असल्याचे तिला समजले . अमली पदार्थाच्या व्यवहारातून अमीन व आई रेश्मा हिच्यात भांडण झाल्यावर तिने दोघांना घरातून बाहेर काढले असता त्याने तिला झरियाब नावाच्या मित्राच्या मीरारोड येथील घरी ठेवले होते . 

तेथून तिने शेजारी व पोलिसांच्या मदतीने स्वतःची सुटका केली व वडीलां कडे राहू लागली . मात्र अमीन याने पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला स्वतःच्या घरी आणले .  अन्य मुलीं सोबत दुबईला जाण्यास सांगणाऱ्या रेश्माला तिने नकार दिला असता तिला मारहाण केली . तिला बळजबरी नमाज पठण व रोझे ठेवण्यास लावले . छळाला कंटाळून अखेर तिने पोलीस ठाणे गाठले . तिच्या फिर्यादी नुसार नया नगर पोलिसांनी अमीन व रेश्मा शेख सह काझी , झरियाब व अन्य एका मित्रा विरुद्ध विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला आहे . अमीन याला अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे . 

Web Title: case has been registered against five people in the case of conversion of a young woman by recording a video in mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.